Breaking News  SAAM TV
महाराष्ट्र

Buldhana Fire: मोठी बातमी! खामगाव 'MIDC'त अग्नितांडव; आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

Buldhana's Khamgaon MIDC Caught Fire: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली. एमआयडीसीमधील जगदंबा ॲग्रोला भीषण आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. २६ मार्च २०२४

Buldhana Khamgaon MIDC Fire News:

बुलढाण्यातून (Buldhana News) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली. एमआयडीसीमधील जगदंबा ॲग्रोला भीषण आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खामगाव एमआयडीसीमधील 'जगदंबा ॲग्रो'ला भीषण आग लागल्याची घटना आज (२६, मार्च) घडली. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीने उग्ररुप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होत आहे.

तसेच आगीचे लोट बाहेर पडत इतर ठिकाणी पसरत आहेत. त्यामुळे बाकी कंपन्यानाही धोका निर्माण झाला आहे. आगीचे लोट बाहेर निघत असल्याने परिसरातही भितीचे वातावरण पसरले आहे. ही आग कशी लागली याबाबतचे कारण अद्याप समोर आले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. (Maharashtra Breaking News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: वारंवार लघवीला जाताय, तहान-भूक वाढलीये? डायबेटीजच्या सुरुवातीच्या ४ लक्षणाकडे दुर्लक्षित करु नका, अन्यथा...

Maharashtra News Live Update: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळल्याने राष्ट्रवादी लागली कामाला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार?

Oily Skin Face Wash Tips: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी कोणता फेसवॉश बेस्ट? जाणून घ्या

Petrol Diesel Price: मोठी बातमी! युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT