Buldhana: तीन वाहनांचा विचित्र अपघात; 4 भाविकांचे निधन, 7 गंभीर
Buldhana: तीन वाहनांचा विचित्र अपघात; 4 भाविकांचे निधन, 7 गंभीर संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana: तीन वाहनांचा विचित्र अपघात; 4 भाविकांचे निधन, 7 गंभीर

संजय जाधव, साम टीव्ही

संजय जाधव

बुलढाणा: बुलढाणा Buldhana जिल्ह्यात चिखली-खामगाव मार्गावर वैरागड गावाजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहाडी घाटात बोलेरो- बोलेरो पिकअप व आणि टाटा सुमो या तीन वाहनांचा अपघात झाला आहे अशी माहिती आहे.

हे देखील पहा-

आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात टाटा सुमो गाडीचा चुराडा झाला आहे. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावीतरण कंपनीच्या सुमो गाडीला धडकून हा विचित्र अपघात झालं आहे.

शेतातील सोयाबीन बाजारात विक्री साठी घेऊन जात असलेल्या दोन बोलेरो जीप घेऊन जात होते, बोलेरोला समोरून येणाऱ्या टाटा सुमो जीपला धडक बसली त्याच बोलेरो च्या मागे दुसरी बोलेरो जीप येऊन धडकली. असा विचित्र अपघात खामगाव जालना मार्गावरील मोहाडी गावानजीक घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील Akola भाविक पंढरपूरकडे Pandharpur जात असताना मोहाडीजवळ वाहनाने धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील मृतांची नावे-

श्यामसुंदर रोकडे (५५)- चालक, विश्वनाथ कराड (७२), शंकुतला कराड (६८), बाळकृष्ण खर्चे (७०),

अपघातातील जखमींची नावे-

मुरलीधर रोहणकार, सुलोचना रोहणकार, उषा ठाकरे, श्यामराव ठाकरे, अलका खर्चे ही आहेत.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: रात्रीच्या जोवणामध्ये कारलं खाल्याने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Shrikant Shinde News | श्रीकांत शिंदेंसाठी राज ठाकरे सभा घेणार का? शिवतिर्थावर खलबतं

Today's Marathi News Live : वर्ध्यातील वादळात मुळासकट संत्राची झाडे जमीनदोस्त

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

Health Tips: उशीच्या कव्हरमुळे होतात त्वचेसंबंधीत आजार; किती दिवसांनी बदलावे कव्हर?

SCROLL FOR NEXT