गडकरींचा लहानग्यांसाठी मोठा निर्णय; बालक जर चार वर्षावरील असेल तर...

मोटारसायकलीवरील प्रवासात चार वर्षाखालील बालकांच्या सुरक्षेसाठी मोटारवाहन कायद्याच्या कलमात सुधारणा केली जाणार आहे.
गडकरींचा लहानग्यांसाठी मोठा निर्णय; बालक जर चार वर्षावरील असेल तर...
गडकरींचा लहानग्यांसाठी मोठा निर्णय; बालक जर चार वर्षावरील असेल तर...Saam TV

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली: मोटारसायकलस्वारांच्या Motor Cycle सुरक्षेसाठी हेल्मेट Helmet वापरणे बंधनकारक असताना आता, चार वर्षाखालील मुलांना देखील यापुढच्या काळात मोटारसायकलवरील प्रवासासाठी हेल्मेट आवश्यक असेल. शिवाय, लहानगा प्रवासी सोबत असल्यास मोटारसायकल स्वाराने ताशी चाळीस किलोमीटरची वेगमर्यादा ओलांडता कामा नये, यावर केंद्र सरकार Central Government लक्ष ठेवणार आहे.

हे देखील पहा-

यासाठी मोटारसायकलीवरील प्रवासात चार वर्षाखालील बालकांच्या सुरक्षेसाठी मोटारवाहन कायद्याच्या कलमात सुधारणा केली जाणार असून यासंदर्भातील प्रस्तावित नियमांचा मसुदाही नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाने जाहीर केला आहे.

या प्रस्तावित नियमांनुसार, चार वर्षांखालील बालक सोबत असल्यास मोटारसायकल स्वाराने बालकाला आपल्या शरिराशी घट्ट बांधून ठेवणारा सुरक्षा पट्टा (सेफ्टी हार्नेस) वापरावा. यासोबतच, नऊ महिन्यावरील ते चार वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी त्यांच्या मापाचे हेल्मेट किंवा सायकलस्वारांसाठी वापरले जाणारे हेल्मेट त्यांच्या डोक्यावर असावे, याची याची जबाबदारी मोटारसायकल स्वारावर असेल.

गडकरींचा लहानग्यांसाठी मोठा निर्णय; बालक जर चार वर्षावरील असेल तर...
Pune: 67 वर्षीय नराधमाकडून 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

या हेल्मेटचे निकष ब्युरो आॅफ इंडियन्स स्टॅन्डर्डतर्फे निश्चित केले जातील. त्याचप्रमाणे, चार वर्षांपर्यंतचे बालक मागे बसलेले असल्यास मोटारसायकलीचा वेग ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा अधिक असता कामा नये, असेही या प्रस्तावित नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com