Pune: 67 वर्षीय नराधमाकडून 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील सामूहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या भयानक घटना घडून काही दिवस उलटले असतानाच पिंपरी - चिंचवडमध्ये मुलींच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
Pune: 67 वर्षीय नराधमाकडून 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
Pune: 67 वर्षीय नराधमाकडून 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचारSaam Tv

गोपाल मोटघरे

पिंपरी : पुण्यातील सामूहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या भयानक घटना घडून काही दिवस उलटले असतानाच पिंपरी - चिंचवडमध्ये मुलींच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. वय उलटूनही वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमांकडून तरुणींबरोबरच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याची प्रकरणे वाढली आहेत. त्यातच आता पिंपरीत 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 67 वर्षीय नराधमाने हे कृत्य केले आहे. पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या Dhighi Police Station Pune हद्दीत गुरुवारी ही घटना घडली.

हे देखील पहा-

शशिकांत आबासाहेब तापकीर (वय 67), असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. त्याला न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रविवारी (ता. 24) रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी पाच वर्षीय मुलीला त्याच्या दुचाकीवरून पेरूच्या बागेच्या गोठ्यात घेऊन गेला होता तेथे त्या नराधमाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com