Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : महामार्गावर रानटी डुकराचा हल्ला; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Buldhana News : महामार्गावर रानटी डुकराचा हल्ला; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : शेगाव येथून अकोट मार्गावरून अकोटकडे (Akot) जाणाऱ्या एका दुचाकीस्वारावर रानटी डुकरांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यास तात्काळ (Shegaon) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Tajya Batmya)

शेगावपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर हि घटना घडली आहे. शेगाव परिसरात रानटी डुकरांनी हैदोस घातला असून गेल्याच महिन्यात एका वृद्ध महिलेवर हल्ला करून त्यात ती महिला जागीच गतप्राण झाली होती. ही घटना ताजी (Accident) असतानाच आज धावत्या दुचाकीस्वारावर रानटी डुकराने हल्ला केल्यामुळे या परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

वन विभागाचे दुर्लक्ष 

रानटी डुकराने हल्ला केल्याची घटना शेगाव अकोट मार्गावर घडली आहे. यात हा दुचाकीस्वार गंभीर जखमी असून त्याच्यावर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रानटी डुकरांच्या बंदोबस्ताबाबत अनेकदा वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. पण वन विभागाकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिक संतप्त होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज

Pune : शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारावर जीवघेणा हल्ला; धारदार कोयत्याने वार,पुण्यात खळबळ

Nail cancer signs: नखांवर काळी रेघ दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; कॅन्सरचं लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं मत

भाजपने शेवटच्या क्षणी काढलं मराठी कार्ड; मित्रपक्षाचा बडा नेताही फोडला

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

SCROLL FOR NEXT