Buldhana Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Accident: ५० प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; भंगार बसेसमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात

Buldhana Bus Accident: बुलढाणा जिल्ह्यातील सर्व एसटी बसेस भंगार झाल्या आहेत.. एक वर्षापासून प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपघात झाली माहिती मिळाल्यानंतरही मेहकर आगार विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचले नसल्याने वाहक चालकाला त्रास सहन करावा लागला.

Bharat Jadhav

संजय जाधव, साम प्रतिनिधी

चिखली आगारच्या एसटी बसला वाघाळा गावाजवळ अपघात झाल्याची घटना घडलीय. धावत्या बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात झाला. अपघातात 50 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र घटना होऊनही मेहकर आगार विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचले नसल्याने वाहक चालकाला त्रास सहन करावा लागला.

चिखली आगार विभागाची चिखली - बीबA प्रवाशी एसटी बस बीबीवरून चिखलीकडे परतत असताना हा अपघात झाला. वाघाळा गावालगत बस आली असताना बसचा स्टेरिंग रोड तुटला. चालकाने बस थाबविण्याचा मोठा प्रयत्न केला परंतु बस रोडच्या साईडला खाली जावून आदळली.यामध्ये बसचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान जिल्ह्यातील सर्व एसटी बसेस भंगार झाल्या आहेत. एक वर्षापासून प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या अपघातात वाहक चालकासह 50 ते 60 जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात पाहताच शिवनी ते वाघाळा येथील नागरिक धावत येवून प्रवाशाना बसमधून बाहेर काढले. जखमीना तात्काळ मलकापूर येथील रुग्णालयात हलविले मात्र घटनेला बराच वेळ होऊनही मेहकर आगार विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाला नव्हते त्यामुळे वाहक चासलकाला फार त्रास सहन करावा लागला.

शिवशाही बस उलटून १० जणांचा मृत्यू, ३०-३५ प्रवासी जखमी

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी ते गोंदिया रोडवर शिवशाही बसचा अपघात मागील महिन्यात झाला होता. शिवशाही बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. 30 ते 35 लोक जखमी झाले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT