Buldhana Bribe Case Saam Tv
महाराष्ट्र

Bribe Case: बांधकाम विभागातील २ अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहात पकडलं

Buldhana Bribe Case: बुलडाण्यामध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

Priya More
  • बुलडाण्यात बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच प्रकरणात अटक

  • कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्रासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप

  • जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर एसीबीची मोठी कारवाई

  • या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली. दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं. बेरोजगार अभियंत्याच्या कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागातील २ अधिकारी आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागातील २ अधिकाऱ्यांनी एका तक्रारदाराकडे बेरोजगार अभियंता कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात खासगी व्यक्तीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत तिघांविरोधात कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने १ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दिली होती. तक्रारदाराला कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचत कारवाई केली.

या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी पैसे मागितल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Spring Roll Recipe: संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी बनवा क्रंची टेस्टी व्हेज स्प्रिंग रोल, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: दिल्ली पोलिसांच्या नोटिशीनंतर अभिजीत दिपके वकिलांशी चर्चा करणार

Skin Care: चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होऊन मिळेल नॅचरल ग्लोईंग सॉफ्ट स्किन, आठवड्यातून २ वेळा लावा हा फेस पॅक

Bad Breath Remedies : तोंडाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? जाणून घ्या तोंडाचा वास घालवण्याचे नैसर्गिक उपाय

Political News : शरद पवारांना मोठा धक्का! ३ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT