बुलढाण्यात दोन दिवसांत दोन बेवारस नवजात शिशु आढळल्याने खळबळ संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाण्यात दोन दिवसांत दोन बेवारस नवजात शिशु आढळल्याने खळबळ

जिल्ह्यात काल आणि आज २ वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस नवजात बालक आढळल्याने खळबळ उडाली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : जिल्ह्यात काल आणि आज २ वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस नवजात बालक आढळल्याने खळबळ उडाली आहे. अनेक शंका कुशंकाना वाव मिळत आहे. यामुळे आता मानवी मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं आहे. मागील २४ तासात बुलढान्यातील जळगाव जामोद आणि मलकापूर शहरातील परिसरात २ बेवारस नवजात शिशु आढळल्याने नागरिकांत शंका कुशंका उभ्या राहत आहेत.

काल सकाळी जळगाव जामोद शहरानजीक एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बेवारस परिस्थितीत फेकून दिलेलं स्त्री जातीच बाळ शेतात जाणाऱ्या महिलांना दिसून आले आहे. पोलिसांनी तात्काळ या बाळाला प्रथम जळगाव मामोड ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर खामगाव सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा नोंद करून, या बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू केले आहेत.

हे देखील पहा-

या घटनेला २४ तास उलटत नाहीत तर, आज सकाळी मलकापूर शहरातील एका बंद पडलेल्या कोविड सेंटरच्या मागच्या निर्जन जागी ड्रेनेज टॅंक मध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना रडण्याचा आवाज आलयाने, जाऊन बघितले असता तर एक पुरुष जातीच नुकतेच जन्माला आलेलं बाळ बेवारस आढळून आले आहे. या बाळाला तात्काळ मलकापूर सामान्य रुग्णालयात भरती केलं, असून मलकापूर शहर पोलीस याचा तपास करत आहेत.

मागील दीड वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे लाखो लोक बेरोजगार झाली आहेत. काम नसल्याने, गरिबांचे हाल होत आहेत. यामुळे स्वतःच पोट भरने अवघड असल्याने, आता या झालेल्या बाळाचं कस होईल या विवंचनेतून अशा घटना वाढल्याचे काही या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना वाटत आहे. तर काही बाबीत अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला असे बेवारस फेकून दिले जात असल्याचे समोर येत आहे. या दोन्ही घटनेत जळगाव जामोद आणि मलकापुर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, असून या दोन शिशु पालकांचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchamrit Recipe : ना फाटेल ना होईल आंबट; श्रावणात पंचामृत बनवताना वापरा 'ही' १ ट्रिक

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये ठाकरे सेनेचा जन आक्रोश मोर्चा

Pune : पैशांसाठी ढसाढसा रडला, उत्तर प्रदेशच्या तरुणाने पुण्यात स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला

नागपंचमीचा उपवास भावासाठी का करायचा? कारण तुम्हाला माहिती असायला पाहिजे

Gen Alpha Club : रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता? भिवंडीच्या मुलींचा संतप्त सवाल; व्हिडिओ तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT