Buldhana News
Buldhana News  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News : हुंड्यासाठी मानसिक छळ; विवाहितेनं संपवलं जीवन, मेहकर तालुक्यातील घटना

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टिव्ही

Buldhana News Today : हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ व सासरच्या जाचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे ३० सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह ५ जणांना अटक केली आहे. (Buldhana News Today)

राधिका पवन खेत्री (वय २२) असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. राधिकाला अवघी ८ महिन्यांची चिमुकली असून या घटनेने समाजमन अगदी सुन्न झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी मृत राधिकाचा विवाह देऊळगाव माळी येथील पवन विश्वनाथ खेत्रे या युवकासोबत झाला होता.

विवाह झाल्यापासून पती व सासारकडील मंडळी राधिकाला सतत माहेरवरून पैसे आण अशी मागणी करीत होते. दरम्यान ८ महिन्यापूर्वी गौरी नावाची मुलगी झाली होती. मुलीला होणारा त्रास बघून राधिकाच्या माहेरकडील मंडळींनी सासरकडील मंडळी सोबत दोनवेळेस बैठका घेऊन काही पैसे दिले होते.

मात्र, तरी सुद्धा सासरकडील मंडळी राधिकाचा छळ करीत होते. यामध्ये राधिकाच्या पतीचा देखील समावेश होता. सतत मानसिक छळ होत असल्याने अखेर कंटाळून राधिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मन मिळाऊ सुस्वभावी स्वभावाच्या राधिकाने अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राधिकाच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राधिकाच्या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल केलाय. या पाचही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Today's Marathi News Live : उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

SCROLL FOR NEXT