Viral Video
Viral Video Saamtv
महाराष्ट्र

Viral Video: देशप्रेम प्रथम! घरी १० महिन्याचं बाळ अन् आई सीमेवर निघाली, कोल्हापूरच्या लेकीने देशाला रडवलं; पाहा VIDEO

Gangappa Pujari

Kolhapur: सिमेवरील जवानांच्या शौर्याच्या गाथा आपण नेहमीच ऐकत असतो, पाहत असतो. सीमेवरील जवानांच्या विरतेची महती सांगावी तितकी कमीच आहे. गावं, घर, आईचं प्रेम, बापाची माया सगळ्यापासून दूर जावून हे जवान आपल्या मायभूमीसाठी बलिदान देत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. पुरूषांप्रमाणे महिलाही सिमेवर कर्तव्य बजावत असतात. सिमेवर कर्तव्य बजावणाऱ्या या शुरांना आईची आणि देशसेवेच्या अशा दोन भूमिका एकाचवेळी पार पाडाव्या लागतात. मग अशा वेळी कर्तव्यला प्राधान्य देत नेशन फस्ट म्हणत या रणरागिणी सीमेवर जातात. याच क्षणाचा भावस्पर्शी व्हिडिओ (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोल्हापूरच्या (Kolhapur) वर्षा पाटील यांचा आहे. या भारतीय सीमासुरक्षा दलात (बीएसएफ) मध्ये जवान आहेत. त्या गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय सुट्टीवर होत्या. आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी सोडून त्या पुन्हा एकदा कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जात होत्या. कोल्हापूरहून नियुक्तीच्या ठिकाणी जातानाचा कुटुंबांना निरोप देत होत्या. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

कारण त्या आपल्या दहा महिन्याच्या तान्हुल्या बाळाला घरी सोडून जात होत्या. मग बाळाला आणि कुटुंबियांना सोडून जाताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. मार्तृत्व आणि कर्तव्याचा मेळ राखत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांना निरोप देताना सगळेच भावूक झालेले या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या असून महिलांना कमजोर समजणाऱ्या प्रत्येका पुरूषाला हे सडेतोड उत्तर असल्याचे मत अनेकांनी याबद्दल व्यक्त केले आहे. वर्षा पाटील यांच्या सारख्या अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहे. देशाला प्रथम प्राधान्य देत, नेशन फस्टची घोषणा त्या सदैव देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मराठी भाषेला मागच्या १० वर्षांपासून मोदी सरकारने अभिजात दर्जा दिला नाही; जयराम रमेश

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

SCROLL FOR NEXT