Pune Rain : बाबो! पुण्यात साडेचार वाजताच पडला अंधार; नेमकं कारण काय?

पुण्यात साडेचार वाजताच अंधार पडला आहे.
Pune Rain
Pune RainSaam Tv

Rain News : पुण्यात काल (१५ फेब्रुवारी) रात्री अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज (१६ फेब्रुवारी) पुन्हा पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात विविध भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. शहरात सर्वत्र ढगाळ वातावरण असून साडेचार वाजताच अंधार पडला आहे.  (Latest Marathi News)

तसेच शहराच्या बाहेर उपनगर परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे. १८ मार्चपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune Rain
Bribe Trap: खळबळजनक..संप काळातही घेतली लाच; वाळू वाहतुकीसाठी घेतले २५ हजार

सातारा जिल्ह्यात काही अवकाळी पाऊस

सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई खंडाळा, सातारा तसेच महाबळेश्वर तालुक्याला सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपुन काढलं. यामुळं या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सोसाट्याच्या वारा आणि वीजांच्या कडकडाटासह काही भागात पाऊस (Rain) अक्षरशः धो धो कोसळल्या मुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला आहे.

नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे बारड इथल्या महामार्ग पोलिसांच्या चौकीवरचे टिनशेड उडून गेले. महामार्गाच्या या पोलीस चौकीत गारांचा अक्षरशः खच पडलाय. अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने या पोलीस चौकीची पूर्ण वाताहत झालीय. या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या गारपिटीचा मोठा फटका बसलाय.

Pune Rain
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंना वरळीत आणखी एक धक्का, आगामी निवडणुकीत मतदारसंघातलं गणित बिघडणार?

जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

जालना जिल्ह्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. जालना शहरासह जिल्ह्यातील बदनापूर, अंबड, भोकरदनसह परतूर आणि मंठा तालुक्यात पावसानं हजेरी लावलीय. जाफ्राबाद तालुक्यात देखील काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झालाय. मंठा तालुक्यातील तळणी शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com