Jalgaon ACB Bribe Trap
Jalgaon ACB Bribe TrapSaam tv

Bribe Trap: खळबळजनक..संप काळातही घेतली लाच; वाळू वाहतुकीसाठी घेतले २५ हजार

खळबळजनक..संप काळातही घेतली लाच; वाळू वाहतुकीसाठी घेतले २५ हजार

धरणगाव (जळगाव) : वाळू वाहतुकीला रोखण्यासाठी प्रयत्‍न केले जातात. तरी देखील चोरटी वाहतुक सुरूच (Jalgaon News) असते. अशाच प्रकारे वाळू वाहतुक सुरू राहू देण्यासाठी नायब तहसीलदाराने लाच मागितली. ही लाच स्‍वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पथकाने रंगेहाथ पकल्‍याचा धक्‍कादायक प्रकार धरणगाव (Dharangaon) तहसील कार्यालयात झाला आहे. (Maharashtra News)

Jalgaon ACB Bribe Trap
Bhusawal News: रेल्‍वेने विना तिकिट प्रवास; एकाच दिवसात १७ लाखाचा दंड वसूल

धरणगाव तहसीलच्‍या महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार जयवंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे यांनी तक्रारदाराकडे वाळू वाहतूक डंपरने सुरु राहू देण्यासाठी ३० हजाराची लाच मागितली होती. ती तडजोडअंती २५ हजार रुपये निश्चित झाली. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली होती.

सापळा रचत पकडले

तक्रारादाराकडून प्राप्‍त तक्रारीनुसार आज (१६ मार्च) दुपारी एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी पथकाचा सापळा रचला होता. या दरम्‍यान तक्रारदाराकडून २५ हजाराची (Bribe) लाच घेताना कोतवालासह नायब तहसीलदार यांना ताब्यात घेतले आहे. धरणगाव तहसील कार्यालयात केलेल्या कारवाईने अधिकारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com