प्रेम प्रकणातून युवकाची निर्घृण हत्या; आरोपीचाही मृत्यू !  Saam Tv
महाराष्ट्र

प्रेम प्रकणातून युवकाची निर्घृण हत्या; आरोपीचाही मृत्यू !

अकोल्यातील मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूर येथे एका युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली आहे.

जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील Akola  मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूर येथे एका युवकाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली आहे. या युवकाचे वय ३५ वर्ष होते.  धम्मपाल आटोटे असे युवकाचे नाव असून आज ही घटना अकोल्यात घडली आहे. Brutal murder of a young man over a love affair

या घटनेत धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर यात मृतकाचा भाऊ किरकोळ जखमी झाला आहे. तर या भयानक घटनेतील आरोपी गंभीर जखमी झाला आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून  धम्मपाल उर्फ आदेश आटोटे  हा परीचीत होता. तो औरंगाबाद Aurangabad येथे वास्तव्यास होता. त्याच्या भाच्याच्या लग्नासाठी तो २९ जून रोजी गावी आला होता. धम्मपाल याच्या मागावर  आरोपी दिपकराज डोंगरे (वय ५५) राहणार प्रतिक नगर मूर्तिजापुर हा २९ तारखे पासूनच होता.

हे देखील पहा -

३० जून रोजी दिपकराज डोंगरे याने धम्मपाल याला घरीच समशेरपूर येथे गाठले. तेथे त्याच्या पोटात आरोपीने चाकूने व कोयत्याने जोरदार वार केले. या घटनेत धम्मपाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या दरम्यान मृतकाचा मोठा भाऊ हा वाद सोडवण्यासाठी गेला होता तेव्हा त्याच्या उजव्या हातावर चाकूने वार कागल आणि तो जखमी झाला. 

तर वार करणारा आरोपी दिपकराज डोंगरे हा त्यात गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यास पुढील उपचारासाठी अकोला येथे रुग्णालयात पाठविण्यात आले होते. उपचार दरम्यान डोंगरे याचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील आरोपी मृतक दिपकराज डोंगरे हा केंद्र प्रमुख होते. अॅक्शन फोर्स शिक्षक संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष व प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा अध्यक्ष देखील होता.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT