Crime: अहमदनगरमध्ये हॉटेलात काम करणाऱ्या महिलेचा निर्घृण खून ! गोविंद साळुंके
महाराष्ट्र

Crime: अहमदनगरमध्ये हॉटेलात काम करणाऱ्या महिलेचा निर्घृण खून !

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील लोणी गावात 59 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे.

गोविंद साळुंके

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील लोणी गावात 59 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी लोणी पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

माहितीनुसार, अंजना मोहिते असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मूळची केडगावची रहिवासी होती. अंजना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलसमोर समोर असलेल्या हॉटेल पाकिजा येथे गेल्या 15 वर्षांपासून कामाला होत्या. तर हॉटेलमधील एका लहान खोलीत त्या वास्तव्यास होत्या. हॉटेल मालक सकाळी आठ वाजता हॉटेलवर आले आणि त्यांनी अंजनाबाई मोहीते यांना आवाज दिला. मात्र तिकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर हॉटेल मालक तिच्या खोलीच्या दिशेने गेले जाऊन पाहतात तर खोलीचा दरवाजा उघडा दिसला. तेव्हा त्यांनी आत डोकावले आणि त्यांना अंजनाबाई मोहीते यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.

त्यांनी याबाबत लोणी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला. दगड डोक्यात घालून अंजनाबाई मोहीते खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अज्ञात आरोपी विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT