FOUR INJURED IN VIOLENT SWORD ATTACK IN BEED’S DOKA VILLAGE Saam tv news
महाराष्ट्र

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Shocking Attack in Beed: बीडच्या डोका गावात जुन्या वादातून तलवार व लोखंडी रॉडने हल्ला, चार जण गंभीर जखमी, सात जणांविरोधात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. जुन्या वादातून तलवार, कोयता, लोखंडी रॉड आणि दगडाने चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी कारवाई करत ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बीडच्या केज तालुक्यातील डोका गावात हाणामारीचा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसारस दोन गटात वाद उफाळून आला. विक्रम भांगे, सागर भांगे आणि त्यांच्यासोबत आणखी पाच जणांनी मिळून "तुम्ही आमच्यावर गुन्हा का दाखल केला?" या कारणावरून तक्रारदार पक्षावर हल्ला चढवला. त्यांनी धारदार शस्त्रं आणि दगड वापरत जोरदार मारहाण केली.

आरोपींनी केलेल्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी केज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच ७ आरोपींवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडून तपास सुरू असून, हल्लेखोर आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पुसदच्या आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असून, चिखल आणि अस्वच्छतेमध्ये भाजीपाल्याची विक्री होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाजारात पायवाटाही चिखलमय झाल्याने खरेदीदार आणि विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घाणीत भाजीपाला खुलेपणाने विकले जात असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तीव्र तक्रार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

Raj Thackeray: उद्धव ठाकरे पाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT