K. Chandrasekhar Rao in Nagpur saam tv
महाराष्ट्र

BRS Nagpur News: देशात उच्च दर्जाचा बदल हाच पक्षाचा उद्देश! सत्तापरिवर्तनासाठी के चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रातून एल्गार

K Chandrasekhar Rao's Party Entered in Nagpur: आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन स्वतःच्या पक्षाच्या कार्यलयाचे उदघाटन केले.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

K. Chandrasekhar Rao in Nagpur: महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाचा प्रवेश झाला आहे. तेलंगणा राज्यात सत्तेत असलेल्या बीआरएस (BRS) म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात आपलं नशीब आजमणार आहे. आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन स्वतःच्या पक्षाच्या कार्यलयाचे उदघाटन केले.

यावेळी पार पडलेल्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. के चंद्रशेखर राव म्हणाले, बीआरएस पक्षाचा उद्देश देशात उच्च दर्जाच्या बदलाची गरज आहे. आम्ही आमची सुरुवात महाराष्ट्रापासून केलीय. यानंतर आम्ही मध्यप्रदेश, राजस्थान असं करत पुढे जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले. फडणवीसजी यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबवाव्या, मी महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशात जाईल असेही ते म्हणाले.

देशात सर्व स्तरातील लोक नाराज - के चंद्रशेखर राव

के चंद्रशेखर राव म्हणाले, देशात सर्व स्तरातील लोक नाराज आहे. देशाची अर्थव्यवस्था बिघडली आहे. मेक इन इंडिया कुठे गेली माहित नाही. देशात गरज नसलेल्या वस्तूंची आयात वाढली आहे. आपला देश कृषी प्रधान आहे तरीही १ लाख कोटीचे पाम तेल आयात करतोय. हे तात्काळ थांबायला हवं. देशात चांगल्या दर्जाच्या परिवर्तनाची गरज आहे, असेही ते म्हणाले.

'गरज नसताना अनेक गोष्टींची आयात'

पुढे बोलताना के चंद्रशेखर राव म्हणाले, आपण चायनातून बऱ्याच गोष्टी आयात करतोय. आपण बनवू शकतो त्या गोष्टी ही आपण आयात करतोय. संविधान, न्यायपालिका अशा बऱ्याच गोष्टीत स्ट्रक्चरल बदल होणं गरजेचं आहे. पाणी आणि वीज महत्त्वाचे विषय आहेत. गरजेपेक्षा जास्त पाणी आपल्याकडे आहे. परंतु गेल्या ७५ वर्षांत धोरणं न बदलल्याने ८० टक्के पावसाचं पाणी समुद्रात वाहून जातंय. पाणी प्रश्नावर राज्यांना आपआपसात का लढवलं जातंय? असा सवा देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

'म्हणून महाराष्ट्रापासून सुरुवात केलीय'

ते म्हणाले, अन्न प्रक्रिया उद्योग वाढवून निर्यात वाढायला हवी. दमदार सरकार असलं तर देशात अशी शेती आहे की प्रत्येक एकरात पाणी दिलं जाणं शक्य आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांत देशाची राजधानी दिल्लीत पाण्याची समस्या आहे. प्रत्येक गोष्टीत आपण खाली चाललोय. आम्ही अनेक आघाड्या पाहिल्या, पण त्या पर्याप्त नाही. त्यामुळे आम्ही आमचा अजेंडा पुढे नेतोय. हा अजेंडा मान्य असणारे पक्ष आमच्यासोबत येऊ शकतात. आमचा पक्ष आता प्रादेशिक पक्ष नाही, तर राष्ट्रीय पक्ष आहे. सर्वाधीक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रापासून सुरुवात केलीय. (Breaking News)

'स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आम्ही सोडला नाही'

स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आम्ही सोडला नाही, पकडला पण नाही. राज्य बनवण्याबाबत केंद्र सरकारने विचार करायला हवा असे देखील ते म्हणाले. देशात आणखी १०-१५ राज्य बनले तर काय जाणार आहे? आणखी राज्य झाले तर विदर्भही वेगळा होईल आणि विकास होईल, असे मत चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केलं. (Latest Political News)

'देशात उच्च दर्जाच्या बदलाची गरज'

ते म्हणाले, येत्या काळात आम्ही महाराष्ट्रातील सर्व निवडणूका लढवणार आहोत. सर्व जागा लढवणार आम्ही आमचा बेस बनवणार आहोत. BRS पक्षाच्या स्थापनेचा उद्देश हा आहे की, देशात उच्च दर्जाच्या बदलाची गरज आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर योग्य नाही, तसंच वीज क्षेत्राचं खाजगीकरणही योग्य नाही. लोकांना शंका असेल तर ईव्हीएम बंद करायला हवं अशी स्पष्ट मंत यावेळी चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT