Jalna Crime News: महसूल विभागाच्या पथकासमोरच वाळू माफियांचा राडा! तलवारी आणि लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ला

Jalna Sand Mafia News: या वादानंतर महसूल विभागाच्या पथकाने या ठिकाणाहून पळ काढल्याचे सांगितले जात आहे.
Sand Mafia Attack With Swords and rods
Sand Mafia Attack With Swords and rodsSAAM TV
Published On

Sand Mafia Attack With Swords And Rods: भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हसनाबाद गावाजवळच असलेला गिरीजा नदीपात्रावरील पुलावर महसूल विभागाच्या पथकासमोरच वाळू माफीयांनी एकमेकांवर तलवारी आणि लोखंडी रॉड काढून एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.

सुमारे एक तास हा राडा सुरू होता अशी माहिती समोर आली आहे. गिरजा नदीपात्रामध्ये वाळू माफियाकडून हायवा जेसीबी ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. यादरम्यान वाळू उपसण्याच्या हद्दीवरून दोन गटात वाद अशी माहिती समोर आली आहे. (Breaking News)

Sand Mafia Attack With Swords and rods
Mumbai Congress President: वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! माझी बहीण पहिली महिला अध्यक्ष झाली - भाई जगताप

विशेष म्हणजे महसूल विभागाच्या पथकासमोरच हा वाद झाल्याची माहिती आहे. या वादानंतर महसूल विभागाच्या पथकाने या ठिकाणाहून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. यानंतर दोन्ही गटात वाद मिटल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हसनाबाद पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटावर 107 प्रमाणे कारवाई केली आहे. (Latest Political News)

Sand Mafia Attack With Swords and rods
Top 10 Schools in India: मुंबई पब्लिक स्कूलला ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ पुरस्कार, भारतातील अव्वल दहा शाळांत झाली निवड

या प्रकरणी ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र देऊन संबंधीत वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वाळूमाफियामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाताला धोका असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलंय. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडण्याचे कामे या ठिकाणी होत असल्याचा आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. संबंधित वाळू माफियावर आणि स्थानिक प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com