Mumbai Congress President: वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! माझी बहीण पहिली महिला अध्यक्ष झाली - भाई जगताप

Bhai Jagtap on Varsha Gaikwad: भाई जगताप यांनी माझी बहीण पक्षाची पहिली महिला अध्यक्ष झाली आहे याचा मला आनंद आहे असे मत व्यक्त केले.
Bhai Jagtap on Varsha Gaikwad
Bhai Jagtap on Varsha Gaikwadsaam tv

Mumbai Congress New President Varsha Gaikwad : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून भाई जगताप यांची उचल बांगडी झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी आज मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे नेते संजय निरुपम, अस्लम शेख, नसीम खान, भाई जगताप, बाबा सिद्धिकी यांची उपस्थिती होती.

माझी बहीण पहिली महिला अध्यक्ष झाली - भाई जगताप

यावेळी बोलताना भाई जगताप यांनी माझी बहीण पक्षाची पहिली महिला अध्यक्ष झाली आहे याचा मला आनंद आहे असे मत व्यक्त केले. भाई जगताप म्हणाले, साधारण 32 महिन्यांपूर्वी स्वर्गीय नेते एकनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीत मी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. आज तो मी वर्षा गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करत आहे.

माझी बहीण पहिली महिला अध्यक्ष झाली आहे. मी तिचा भाऊ आहे. त्या पक्षाला पुढे घेऊन जातील. वरती बसलेला बाबा मित्रो म्हणून देशाला लुटत आहे, खाली शिंदे सरकार लुटत आहे. मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेल असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

Bhai Jagtap on Varsha Gaikwad
Nagpur News: भाजपचे 2 माजी आमदार BRS च्या गळाला! के चंद्रशेखर राव यांचं नागपूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

महत्वाच्या वेळी ही जबाबदारी दिली - अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मिश्किल टिप्पणी करत म्हणाले, आज महिलांची संख्या जास्त झाली आहे. आता पुरुषांना आरक्षण देण्याची गरज आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपद हे एका महिलेला देणे ही फार मोठी गोष्ट आहे. महत्वाच्या वेळी ही जबाबदारी दिली गेली आहे. मधल्या काळात एकनाथ गायकवाड यांना कमी कालावधीसाठी या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.

26/11 चा हल्ला झाला तेव्हा मला सोनिया गांधी यांनी मला बोलावून ही जबाबदारी दिली होती. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही वेळी लोक आपल्याला साथ देतील. कर्नाटकमध्ये लोकांनी चमत्कार केला आणि काँग्रेस सरकार आले. तेच महाराष्ट्रात होणार शक्य आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. भाई जगताप यांना सुद्धा भरपूर काम करायचं आहे, तुम्ही मावळते अध्यक्ष असलात तरी मावळले नाही आहात असे देखील चव्हाण म्हणाले. (Breaking News)

तुम्ही नवा इतिहास लिहाल - पृथ्वीराज चव्हाण

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, वर्षाताई यांना शुभेच्छा देतो की तुम्हाला यश मिळावे आणि मुंबईमध्ये पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवला पाहिजे. यासाठी तुमचे हात बाळकट करतो. मागील सरकारमध्ये त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केले. सक्षमपणे जबाबदारी सांभाळली. कर्नाटक विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. सर्वासामान्य लोक भाजपच्या जाचाला कंटाळले आहेत. या सरकारला अपयश आले आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात काय वाद आहे ते जाहीर वर्तमान पत्रातून येत आहे. वातावरण तयार आहे. पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून तुम्ही नवा इतिहास लिहाल असा विश्वास आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (Latest Political News)

Bhai Jagtap on Varsha Gaikwad
Ram Lalla Abhishek ceremony: अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील - योगी आदित्यनाथ

सुशील कुमार शिंदे यांचा कानमंत्र

सुशील कुमार शिंदे यांनी देखील यावेळी वर्षा गायकवाड यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, भाई जगताप यांनी मोठ्या मनाने आपली अडीच वर्षाची सत्ता त्यांच्याकडे सोपावली. एक दलित महिला तिच्या हातात हे नेतृत्व दिले. मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांनी हातात हात घालून काम करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे, असे देखील सुशील कुमार म्हणाले. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com