Hingoli crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : भयंकर! प्रॉपर्टीचा वाद जिवावर उठला, मोठ्या भावानं लहान भावालाच संपवलं

Hingoli Crime News: हिंगोलीच्या शेगाव खोडके गावात सख्ख्या मोठ्या भावानं, प्रॉपर्टीचा हिस्सा लहान भावाला मिळू नये म्हणून हत्या केलीय. मात्र, आरोपीला अटक केल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्याला मदत केलीय.

Bhagyashree Kamble

प्रॉपर्टीचा हिस्सा लहान भावाला मिळू नये, म्हणून मोठ्या भावानं त्याची हत्या केलीय. ही धक्कादायक घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात घडलीय. ही घटना घडल्यानंतर मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, आरोपीला अटक केल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्याला मदत केलीय. पोलीस कोठडीतून व्हिडिओ कॉल करण्याची मुभा दिल्याचा प्रकार उघड झाला होता. परंतू अद्यापही त्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय.

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात, सख्ख्या मोठ्या भावानं, लहान भावाची हत्या केलीय. प्रॉपर्टीचा हिस्सा मिळू नये म्हणून ही हत्या केल्याचं उघड झालंय. या हत्येप्रकरणात आरोपी हरिभाऊ किसन खोडके याला पोलीसांनी अटक केलं आहे. मात्र, गोरेगाव पोलीस स्थानकातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं आरोपीकडून पैसे उकळण्यासाठी चक्क पोलीस कोठडीतून व्हिडिओ कॉल करण्याची मुभा दिली. या विरूद्ध ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.

आरोपीनं रिसोडमध्ये एका सोने चांदीच्या व्यापाऱ्याकडे सोन्याची साखळी मोडण्यासाठी दिली. सोन्याची साखळी मोडून पैसे उपलब्ध करता यावे, यासाठी गोरेगावातील पोलीस कर्मचाऱ्यानं आरोपीला व्हिडिओ कॉल करून देण्याची सोय करून दिली. या संपूर्ण प्रकरणाची बातमी साम टीव्हीनं प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश देखील दिले होते.

मात्र, दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी देखील आरोपीला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. तरी देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी विरोधात कारवाई का करत नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. आरोपी आणि आरोपीला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करून असा इशारा ग्रामस्थांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Polls 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

MHADA Scheme : स्वस्त घराची संधी! ३१ ऑगस्टपर्यंत म्हाडा घरांसाठी अर्ज करा, सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या

Maharashtra Live News Update : मोटरसायकल चोर पोलीस स्थानकातून फरार

Pune News: पुण्यात कोयता गँगचा उच्छाद, बाईकवरुन उतरताच दुकानं फोडली; पाहा VIDEO

Car insurance: वादळी पावसात कारवर झाड पडले तर विमा मिळतो का?

SCROLL FOR NEXT