Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : अनैतिक संबंधाला अडथळा, मावसभावाने काढला भावाचा काटा, नाशिक हादरले!

crime News : नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मावसभावाने भावाची हत्या केली.

Namdeo Kumbhar

Nashik Crime News Update : नाशिक अनैतिक संबधाला अडथळा ठरत असलेल्या भावाचा सख्या मावसभावाने काटा काढण्याकरीता भावाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी फाडा परिसरातील कचरा डेपो परिसरात उघडकीस आला. डोक्यात काहीतरी वस्तूने वार करत खुन केल्याचे प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार संशयित फरार आहेत.आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील कचरा डेपो च्या मागे एका व्यक्तीचा मृतदेह अाढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पथकाने घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.

मयताच्या खिशातून अधारकार्ड मिळून आले. त्या अधारे मयताची ओळख पटवण्यात आली. योगेश सुभाष बत्तासे वय ३१ रा. पिंपरखेड असे नाव निष्पन्न झाले. मयताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला कुटुंबियांना ओळख पटवली. त्याच्या चौकशीत मयताच्या पत्नीचे त्याच्या मावस भावासोबत अनैतिक संबध असल्याची माहिती मिळाली. मयताला अनैतिक संबधाची भनक लागल्याने पती पत्नी मध्ये वाद सुरु असल्याचे समजले. वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित मावसभावाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

SCROLL FOR NEXT