Aurangabad Crime अविनाश कानडजे
महाराष्ट्र

कार्यालयात घुसून व्यावसायिकाला मारहाण करत १३ तोळे सोने लंपास...(पहा Video)

दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरातील व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ६६ वर्षीय वृद्धाच्या कार्यालयात (office) जाऊन दोन अज्ञात आरोपीनी बेदम मारहाण (Beating) करून तब्बल १२ तोळे वजनाच्या गळ्यातील ३ सोन्याच्या चेन ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना शहरातील (city) वरद गणेश मंदिरामागे घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यवसाईकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अशोक शनकारराव पाटील असे व्यापाऱ्याचे नाव आहे. (broke into office beat up businessman stole 13 ounces gold

पहा व्हिडिओ-

या प्रकरणी पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांचे बसस्थानक समोरील भागात जमीन खरेदी- विक्रीचा व्यावसायिक (Professional) कार्यालय आहे. याच ठिकाणी ते सर्व व्यवहार करतात. काल दुपारच्या सुमारास पाटील त्यांच्या रचना नावाच्या महिलेसोबत कार्यालयात असताना अंदाजे २५ वयोगटातील दोन आरोपी त्यांच्या कार्यालयात आले होते. रचना हिला कार्यालयातून हाकलून बाहेर काढले. काही समजण्याच्या आतच दोन्ही आरोपीनी पाटील यांना मारहाण करत गळ्यातील ४ सोन्याच्या (gold) साखळ्या ओरबाडल्या ४ सोनसाखळ्या मधील अर्धी साखळी खाली पडली आहे.

मात्र,१२ तोळे वजनाची सोनसाखळी घेऊन दोन्ही आरोपीनी वरद गणेश मंदिरा मागील रस्त्याने पोबारा केला. या प्रकरणी पाटील यांना परिचयाच्या असलेल्या रचनावर संशय असल्याने तिघांवर क्रांतिचौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दिवसाढवळ्या गजबजलेल्या भागात मारहाण करून लुटीची घटना घडल्याने परिसरातील व्यावसायिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

Jalna : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाख रुपयांची खंडणी मागणारे दोघे अटकेत, जालना जिल्ह्यात खळबळ

Mughal harem: मुघल हरममध्ये रात्रीच्या वेळेस दासींना कोणती कामं करावी लागत?

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

SCROLL FOR NEXT