औरंगाबादेत सापडले ब्रिटिशकालीन घबाड: प्रियदर्शनी उद्यान खोदकामात आढळली 1689 प्राचीन नाणी अविनाश कानडजे
महाराष्ट्र

औरंगाबादेत सापडले ब्रिटिशकालीन घबाड: प्रियदर्शनी उद्यान खोदकामात आढळली 1689 प्राचीन नाणी

तब्बल २ किलो वजनाची ही नाणी ब्रिटिशकालीन असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट आणि मुद्रा आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद : शहरामध्ये सिडको परिसरात प्रियदर्शिनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे (Balasaheb Thackeray Memorial) काम सुरू आहे. या स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठीच्या खोदकामामध्ये सव्वाशे वर्षांपूर्वीची नाणी आढळून आली आहेत. तब्बल २ किलो वजनाची ही नाणी ब्रिटिशकालीन (British Coins) असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा (Victoria Queen) मुकूट आणि मुद्रा आहेत.

औरंगाबाद महापालिका प्रशासनाने पुरातत्त्व विभागाकडे (Archaeological department) ही नाणी सुपूर्द करण्यात आले आहेत. खोदकाम सुरु असताना एका कापडी पिशवीमध्ये ही नाणी सापडली आहेत. पिशवीत आणखी एका जीर्ण झालेल्या पिशवीमध्ये ही नाणी होती. त्यामुळे नाण्यांचा मातीशी काही संपर्क झाला आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया झाली नाही. सुरुवातीला ही नाणी तांब्याची असावीत अशी शंका आली. हे पडताळून पाहण्याकरिता ज्वेलर्सना बोलावण्यात आले.

हे देखील पहा-

तपासणीमध्ये नाण्यांना अत्यंत उच्च प्रतीचा सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटिश काळातील सोन्याचा मुलामा इतका घट्ट होता की, खूप घासल्यानंतर देखील नाण्याचा रंग फिका पडत नाही. ही नाणी सव्वाशे वर्षांपूर्वीची असून त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुकूट आणि मुद्रा आहेत. एकूण २ किलो वजनाच्या या नाण्यांवर १८८१ चा स्पष्ट उल्लेख आढळत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे काम रत्नगुरू एजन्सीसला मिळाले आहे.

पाठीमागील बाजूस जेसीबीने खड्डे खोदून त्यामधील माती बाहेर काढत असताना सोमवारी संध्याकाळी अचानक नाण्यांचा खणखणाट झाला आहे. पाहणी केली असता एका गाठोड्यामध्ये नाणी सापडली आहेत. काही नाणी खड्ड्यात आढळून आली आहेत. कंत्राटदार रोहीत स्वामी यांनी वॉर्ड अभियंता व्ही. के. गोरे यांना ही माहिती दिली आहे. त्यानंतर महापालिका आणि पुरातत्त्व विभागातर्फे ही नाणी नेमकी कोणत्या काळातील आहेत, कशाची आहेत, यासंबंधी तपास करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT