संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण, व्हिडीओ समोर Google
महाराष्ट्र

Sarpanch Santosh Deshmukh: संतोष देशमुख यांना तीन तास अमानुष मारहाण, १५ व्हिडीओ आणि ८ फोटो समोर

Santosh Deshmukh Case Update: देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता. तो व्हिडिओ कृष्णा आंधळेने एका व्हॅाट्सअॅप ग्रुपवर शेअर केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणात सीआयडीकडून आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील काढण्यात आला होता. तो व्हिडिओ कृष्णा आंधळेने एका व्हॅाट्सअॅप ग्रुपवर शेअर केला. मोकारपंती असं त्या व्हॅाट्सअॅप ग्रुपचं नाव होतं. त्या ग्रुपमध्ये पाच ते सहा जणांनी संतोष देशमुख यांना कश्या प्रकारे मारहाण केली, ते पाहिलं होतं. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने आरोपी केदारच्या फोनमधून जप्त केले.

फॉरेन्सिक कडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्यावर तपासणी केली गेली, आणि त्याचे छोटे छोटे दहा ते बारा व्हिडिओ तयार करण्यात आले. यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये विविध तपशील असलेले संदर्भ दिले गेले. त्यानंतर या व्हिडिओतील व्यक्तींची ओळख फॉरेन्सिक तपासणीच्या माध्यमातून केली गेली, आणि सीआयडीने त्याच प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तींसोबत तुलना केली.

या व्हिडिओतील काही फोटो आरोपपत्रात जोडले गेले आहेत, ज्यात सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसते. अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे, मारहाण करताना संतोष देशमुख यांचे कपडे देखील काढण्यात आले. कपडे काढल्यानंतर त्यांना कशी वागणूक दिली गेली, हे देखील या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

व्हिडिओ तयार करत असताना सुदर्शन घुले आणि त्याचे सहकारी सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे हसत हसत संतोष देशमुख यांना मारहाण करताना दिसतात. या मारहाणीतच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. हे चित्र खूपच धक्कादायक आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT