Prakash Ambedkar/ Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Breaking News: 'राज ठाकरेंवर टाडा लावा, सरकारने ताबडतोब आतमध्ये टाकलं पाहिजे', प्रकाश आंबेडकर संतापले, प्रकरण काय?

Prakash Ambedkar On Raj Thackeray: प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे समाज दुभंगण्याची वक्तव्ये करत असून त्यांच्यावर ताडा लावून सरकारने आतमध्ये टाकलं पाहिजे, असे धक्कादायक विधान केले आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामधील वाढती लोकसंख्या आणि परप्रांतीयांबाबत महत्वाचे विधान केले होते. यावरुन राज ठाकरेंवर निशाणा साधताना वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे समाज दुभंगण्याची वक्तव्ये करत असून त्यांच्यावर टाडा लावून सरकारने आतमध्ये टाकलं पाहिजे, असे धक्कादायक विधान केले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

"महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्यप्रदेश गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं? त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा ताबडतोब लागला पाहिजे," असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. अमरावती ते माध्यमांशी बोलत होते.

"अशा व्यक्तींना सरळसरळ टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी. उद्या उठाव झाला या राज्याने म्हटले तुम जाव आणि तिकडच्या राज्याने म्हटले तुम जाव तर काय होणार?" असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

आपला सर्वाधिक पैसा हा बाहेरच्या लोकांवर खर्च होतोय. ठाणे जिल्हा हा देशातील हा एकमेव जिल्हा जिथे 7-8 महापालिका आहेत. मग इथली लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? ही लोकसंख्या बाहेरच्या लोकांनी वाढवली. आपला पैसा त्यांची व्यवस्था करण्यातच जातो, आपल्या नोकऱ्याच्या जाहिराती युपी बिहारमध्ये येतात, मग आपल्या तरुणांना हे कळत नाही? असा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरेंनी परप्रातीयांवर भाष्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT