cm eknath shinde appeals to manoj jarange patil on maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: तारीख ठरली! मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन

Maratha Aarkshan: मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी २० फेब्रुवारीला राज्य सरकारचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, मुंबई|ता. १४ फेब्रुवारी २०२४

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी २० फेब्रुवारीला राज्य सरकारचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आंदोलनाबाबत अधिसूचना जारी केली होती. मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. शासनाकडून तसं पत्रही मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलं होतं. या निर्णयाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

आता एक दिवसांच्या या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) कायदा पारित करण्याची शक्यता आहे. तसेच सगेसोयरे शब्दाच्या अनुषंगाने कायदा पारित करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण कशासाठी?

सरकारने मराठा आरक्षणबाबत जी अधिसूचना काढली आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. याशिवाय अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, शासनाने सगेसोयरे यांचा कायदा पास करावा, विधिमंडळाचे अधिवेशन घ्यावे, हेैदराबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्वीकारावे इत्यादी मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये सध्या जरांगे पाटील उपोषण करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांची तब्बेत बिघडली, वृंदावनमधील पदयात्रा रद्द

Govinda : गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा! बाउन्सरने धक्काबुक्की केल्याने वाद चिघळला, VIDEO व्हायरल

Chole Bharture Recipe: स्ट्रीट स्टाईल चमचमीत छोले भटुरे बनवायचेत; फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT