Maharashtra latest News|Nagpur Accident Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Accident News: भीषण अपघात! सुसाट कार रेलिंगला धडकून ४- ५ वेळा उलटली, दोघांचा मृत्यू; ३ जखमी

Maharashtra latest News: नागपूर जिल्ह्यातील नागपूर कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ९ जुलै २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. मुंबईच्या वरळीमधील अपघात तसेच पुण्याच्या खडकीमधील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच नागपूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव कार उलटून हा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील नागपूर कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार पलटी झाल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. तीव्र गतीने येणारी एक स्विफ्ट कार रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रेलिंगला धडकली आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन कार पलटी घेऊन अनेक मीटर लांब जाऊन थांबली.

या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी आहेत. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना नागपूरच्या दोन वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये अनोखे आंदोलन

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा; पाच विद्यार्थीनी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

Railway OHE Poles : रेल्वे ट्रॅकजवळील पोलवर असलेल्या या आकड्यांचा अर्थ काय? जाणून घ्या नेमकी माहिती

Maharashtra Politics: लातूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांनी सोडली साथ; 'कमळ' घेणार हाती

AC Servicing: वर्षातून किती वेळा एसीची सर्व्हिसिंग करावी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT