Beed News : बीड बायपासवर ४ वाहने एकमेकांना धडकली; विचित्र अपघातात दोघे ठार, ५ जखमी

Beed Accident News : बीड बायपासवर ४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात दोनजण जागीच ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले.
बीड बायपासवर ४ वाहने एकमेकांवर धडकली; विचित्र अपघातात दोघे ठार, ५ जखमी
Beed Accident NewsSaam TV

बीड बायपासवर ४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात दोनजण जागीच ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास घडला आहे. छोटा हत्ती, रिक्षा, दुचाकी अन् कंटेनर ही वाहने एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड बायपासवर ४ वाहने एकमेकांवर धडकली; विचित्र अपघातात दोघे ठार, ५ जखमी
Nagpur Hit And Run: 'हिट अँड रन'च्या 2 घटनांनी नागपूर पुन्हा हादरलं; दुचाकीस्वाराला स्कूलबसने उडवलं, थरारक VIDEO समोर

अपघात (Accident) एवढा भीषण होता की, चारही वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला. तर कंटेनर आणि रिक्षा रस्त्याच्या खाली गेला. यातच शेजारी हाय होल्टेजची विद्युत वाहिनी तार आणि खांब होती. मात्र सुदैवाने त्याला धक्का न लागल्याने मोठा अनर्थ टळलाय.

या अपघातात बबन बाबूराव बहिरवाळ (वय ४०, रा. भाळवणी, ता. बीड) आणि मोतीराम अभिमान तांदळे (वय २८, रा. तांदळवाडी, ता. केज) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अशोक रामभाऊ बहिरवाळ रा.भाळवणी, ता. बीड (Beed News) हे जखमी आहेत. इतरांची नावे समजू शकली नाहीत.

सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरून बीड शहरात प्रवेश करताना संभाजी चौकात हा अपघात घडला आहे. बीड शहरातून जाणारी वाहने व महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांमध्ये अपघात झाला. कंटेनरची धडक रिक्षाला जोरदार बसली. तर गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारा छोटा हत्ती वाहनाची दुचाकीला धडक बसली.

नंतर हे सर्वच वाहने एकमेकांवर धडकली. यामध्ये दुचाकी व रिक्षात बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.

बीड बायपासवर ४ वाहने एकमेकांवर धडकली; विचित्र अपघातात दोघे ठार, ५ जखमी
Jalgaon Accident : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली; अपघातात तरुणाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com