Shirdi Breaking News Saam TV
महाराष्ट्र

Shirdi Breaking News: काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

Shirdi Latest News: काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर १० ते १२ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Satish Daud

सचिन बनसोडे, साम टीव्ही | शिर्डी, ३ डिसेंबर २०२४

Shirdi Latest Marathi News

काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर १० ते १२ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहाता तालुक्यातील लोणी गावात हा हल्ला झाल्याचं कळतंय. या हल्ल्यात चौगुले यांच्यासह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौगुले यांच्यावरील हल्ल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि शिर्डी ग्रामस्थांची रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला चौगुले यांनी हजेरी लावली. दरम्यान, कार्यक्रमाहून परतत असताना सायंकाळी लोणी गावाजवळ अज्ञात आरोपींनी त्यांच्या कारवर हल्ला केला.

या हल्ल्यात सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे दोघे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन चौगुले यांची भेट घेतली.

यावेळी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. आजची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli News : डोंबिवलीत खांदेरी-उंदेरी किल्ल्यांची भव्य प्रतिकृती; स्वराज्य ग्रुपचा उपक्रम ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

SCROLL FOR NEXT