Today's Marathi News Live  Saam tv
महाराष्ट्र

Today's Marathi News Live : तळकोकणाला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, अनेक भागातील वीज पुरवठा खंडित

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (23 may 2024) : राजकीय घडामोडी, लोकसभा निवडणूक, देशासहित विदेश राज्यातील प्रत्येक घडामोडी, लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर

Vishal Gangurde

तळकोकणाला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, अनेक भागातील वीज पुरवठा खंडित

तळकोकणात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार मान्सून पूर्व पाऊस.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आल्याने अनेक भागात वीज पुरवठा खंडित.

सावंतवाडी बाजारपेठेत सकल भागात पाणी साचल.

एक तास वादळी वाऱ्यासह मुसळधार मान्सून पूर्व पावासाने झोडपले.

डोंबिवली शहरातील केमिकल कंपन्या लवकरच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करणार

पुढील कारवाई करता येईल...पंचनामा झाल्यावर पुढील कारवाई करता येईल

डोंबिवली शहरातील केमिकल कंपन्या या लवकरच दुसरीकडे स्थलांतरीत करणार

पंचनामा झाल्यानंतरच मदत कशाप्रकारे करता येईल ते ठरवलं जाईल

कुणावर अन्याय होऊ देणार नाही

घरांच्या नुकसानाबाबत पंचनामा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल

डोंबिवली दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एम्समध्ये जाऊन केली विचारपूस

डोंबिवलीच्या कारखान्यातील बॉयलरला परवानगी नव्हती,  दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर

डोंबिवलीच्या कारखान्यातील बॉयलरला परवानगी नव्हती

कामगार विभागाची धक्कादायक माहिती

सखोल चौकशीनंतर अतिरिक्त माहिती दिली जाणार

डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटात 8 जणांचा मृत्यू, जखमींची संख्या 64 वर

डोंबिवलीतील एमआयडीसीत अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींचा आकडाही 64 वर पोहोचला आहे.

महापालिका आयुक्तांनी वाकोला,  मिठी नदीला भेट देऊन केली पाहणी

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी वाकोला नदी आणि मिठी नदीला भेट देऊज गाळ उपसा कामांची केली पाहणी

मुंबई महानगरात पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून ठिकठिकाणी नदी आणि नाल्यातून गाळ उपसा करण्याची कामे सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार कामांना वेग

याच पार्श्वभुमीवर आयुक्तांनी अचानक भेट देवून वाकोला नदी आणि मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामाची केली.

तसेच सर्व पाहणी झाल्यानंतर आयुक्यांनी कामावर समाधानही व्यक्त केले

नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा दोन मुलांचा बुडून मृत्यू

- नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा दोन जणांचा पाण्यात बुडाले

- सिन्नर जवळच्या कुंदेवाडीमध्ये देवनदीच्या बंधाऱ्यात दोन मुलांचा बुडून मृत्यू

- उन्हाच्या काहिलीमुळे दोघेजण देव नदीच्या बंधार्‍यात पोहण्यासाठी गेले होते

- स्थानिक आदिवासी तरुणांच्या मदतीने दोघा मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

- नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसात पाण्यात बुडून ९ जणांचा मृत्यू

हिंगोलीत वादळी वाऱ्याने केळीच्या बागा भूईसपाट

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने सलग पाचव्या दिवशीही नुकसान झालं आहे, कळ मनुरी तालुक्यातील दिग्रस वंजारी गावच्या शिवारात पोटच्या लेकरा प्रमाणे जोपासलेल्या केळीच्या बागा वादळी वाऱ्याने उध्वस्त झाल्या आहेत, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं नुकसान

वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका फळबागांना बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील शेवते येथे वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेवते परिसरात शेकडो एकर केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. मागील वर्षी पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून बागा जोपासाव्या लागल्या होत्या. शेवते येथील शेतकरी दशरथ खळगे यांची ६ एकर केळीची बाग उध्वस्त झाली आहे.नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

SDRF च्या शहीद जवानांना शासकीय मानवंदना

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत मानवंदना...

अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवरा नदीत बचावकार्य करताना SDRF चे तीन जवान शहीद...

पार्थिव धुळ्याकडे रवाना करण्यापूर्वी सुगाव येथे देण्यात आली शासकीय मानवंदना...

नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बि.जे. शेखर, पोलिस अधिक्षक राकेश ओला उपस्थित...

डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटात ६ जणांचा मृत्यू

डोंबिवलीतील एमआयडीसीत केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण गंभीर जखमीअसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

श्रीगोंदा तालुक्याला वादळीवारे, वळवाच्या पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...

जोरदार वाऱ्याने अनेक घरांवरचे दुकानावरील पत्रे उडाले..जन जीवन विस्कळीत...

झाडे आणि विद्युत पोल रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प..

नगर दौंड महामार्गवर विजेचे पोल पाडल्याने अनेक वाहने खोळंबली...

विजेचे खांब आणि झाडे रस्त्यावरून हटवण्यासाठी युद्ध पातळीवर ग्रामस्थांचे आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू..

हवामान खात्याने दिला होता वादळी वारे आणि पावसाचा अहमदनगर दिलेला इशारा...

डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटात दोन महिलांचा मृत्यू

डोंबिवलीतील एमआयडीसीत केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण गंभीर जखमीअसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

धुळे शहरात उष्णतेची लाट कायम, 43.5°c तापमानाची नोंद

धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये उष्णतेची लाट अद्यापही कायमच आहे, आज देखील धुळ्यामध्ये 43.5°c तापमानाची नोंद करण्यात आली आहे, जवळपास महिनाभरापासून धुळ्यामध्ये तापमानाचा पारा हा 40 पार असून, गेल्या काही दिवसांपासून हा तापमानाचा पारा आणखीन वाढल्याच पहायला मिळत आहे.

माझ्या मतदारसंघात ४५ मीनिटे सीसीटीव्ही बंद होते : सुप्रिया सुळे यांचा आरोप

माझ्या मतदारसंघाच ४५ मीनिटे सीसीटीव्ही बंद होते. दमदाटी केली जात आहे.

मी १४३ तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.

निवडणूक आयोग स्वत:च आपले कलम बदलत आहे.

१७ सी त्यांनीच काढून टाकला.

आम्ही मेरीटवर पास होतो.

चिटिंग करून पास होत नाही.

CM शिंदेंच्या बैठकीत मराठवाड्यातील पालकमंत्र्यांची दांडी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत मराठवाड्यातील पालकमंत्र्यांची दांडी?

मराठवाड्याच्या पाणी टंचाईवर संभाजीनगरमध्ये आढावा बैठक होणार

काही मंत्री विदेशात आहेत. तर काही देवदर्शनासाठी राज्याबाहेर आहेत.

अनेक पालकमंत्री ऑनलाइन बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची प्रशासनाची माहिती दिली आहे.

डोंबिवली MIDCमध्ये भीषण स्फोट

डोंबिवलीतील एमआयडीसी फेज दोन मध्ये एका कंपनीत स्फोट झाला आहे.

ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांनी रेल्वे प्रबंधकांची भेट घेतली

मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांची भेट

मुंबईतील रेल्वे स्थानकावरील खाद्य पदार्थाचे स्टॉल बंद करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल

पाणीही मिळत नसल्याने प्रवाश्यांचे हाल

उद्धव ठाकरेंच्या वतीने माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी हे स्टॉल पुन्हा सुरु व्हावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाला निवेदन

उद्धव ठाकरेंनी लोकांच्या जीवाशी खेळ केलाय; नालेसफाईवरून भाजपची टीका

आशिष शेलार काय म्हणाले?

मुंबईत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. यामुळे नालेसफाई देखील नीट झाली पाहिजे. नालेसफाई समाधानकारक झालेले नाही. आयुक्तांनी स्वतः नाल्यांची सफाई पहावी. किती मेट्रिक टन गाळ आणि नाल्यांची लांबी पाहावी मग परिणाम सांगावे. नाल्यांचे खोलीकरण न करून ठाकरेंनी लोकांचा जीवाशी खेळ केला आहे.

Kolhapur Rain : कोल्हापुरात मध्यरात्री मुसळधार पाऊस; 25 घरांचे पत्रे उडाले

कोल्हापूर जिल्ह्यात मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. शिरोळ तालुक्यातील टाकळी येथे 25 घरांचे पत्रे उडून पडझड झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील माले येथील बौद्ध स्मशानभूमी भिंत कोसळली. तर अंबप येथे प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले आहेत. पडझडीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Jalna News :मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर, जालना महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर

मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर जालना प्रशासन देखील ॲक्शन मोडवर

जालना महानगरपालिकेकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या अनाधिकृत धोकादायक होर्डिंग जमीनदोस्त

पुढील दोन दिवसांत होर्डिंगची माहिती न दिल्यास कारवाईची व्यापक मोहीम राबवणार

होर्डिंग लावणाऱ्यांना स्ट्रक्चरल ऑडिट वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र यासह इतर आवश्यक कागदपत्रे आता महानगरपालिकेला द्यावी लागणार

Mumbai News: मुंबईतील जी दक्षिण विभागात 3 तास पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईतील जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागात शुक्रवारी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या तीन तास कालावधीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या दुरुस्ती कामामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे.

सिंधुदुर्गात पावसामुळे झाडे उन्मळून पडली

सिंधुदुर्गात काही भागात काल सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. ओरोस, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले भागात या वादळी पावसाने थैमान घातलं. ओरोसमध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या वादळाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात जोरदार पावसासह वादळ दिसून येत आहे. या वादळामुळे काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तर रस्त्यावर झाडे मोडून पडली होती.

आप खासदार मारहाण प्रकरण; आज केजरीवाल यांच्या आई-वडिलांचा जवाब नोंदवणार नाहीत

आप खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाबाबत मोठी अपडेट आली आली आहे.

दिल्ली पोलिस आज अरविंद केजरीवाल यांच्या आई वडिलांचा जवाब नोंदवणार नाहीत.

आज सकाळी 11.30 जवाब नोंदवला जाणार असं पोलिसांकडून सांगितलं होतं.

मात्र पोलीस आता हा जवाब उद्या नोंदवण्याची शक्यता आहे.

प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रज्वल रेवण्णा यांचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाई सुरू केल्याची माहिती दिली.

MEA ला कर्नाटक सरकारने पत्र लिहिलं आहे.

परराष्ट्र मंत्रालय लवकरच यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती

सूत्रांनी दिली.

Parbhani Fire : परभणीत चाऱ्याची गंजी, शेती अवजारे आगीत जळून खाक; आगीच  कारण अस्पष्ट

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील शेतकरी वैजनाथ शिराळे, गंगाधर शिराळे यांच्या शेतातील चाऱ्याची गंजी ,ठिबक सेट, शेती अवजारे आगीत जळून खाक झाले. या आगीत त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आगीच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

Nashik News : नाशिक वाहन जाळपोळ प्रकरण; 5 संशयितांना शनिशिंगणापुराहून अटक

नाशिक: जुने नाशिकमध्ये घरा बाहेर उभे असलेल्या गाड्यांची जाळपोळ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर आली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या सह गुन्हे शोध पथकाने 5 संशयितांना शनिशिंगणापूरहून अटक केली.

आमदार पीएन पाटील यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल

काँग्रेसचे आमदार पीएन पाटील यांचं पार्थिव हॉस्पिटलमधून काँग्रेस कमिटीकडे रवाना झालं होतं. त्यानंतर आता आमदार पीएन पाटील यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल झालं आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे. अनेक कार्यकर्ते टाहो फोडून रडले.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या मतदानाचा प्रचार आज थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांवर निवडणुका होत आहे. आज भाजप, काँग्रेस, आप या सर्वच पक्षांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सभा आणि रोड शो होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रोड शो आणि कॉर्नर सभा घेणार आहेत.

Mumbai Latest News : मुंबई महापालिकेकडून होर्डिंगसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील होर्डिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आठ सदस्यांची स्थापना करण्यात आली आहे. आयआयटी बॉम्बेमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.

 washim Rain News : वाशिममध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

ढगाळ वातावरणात वाशिम शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशिममध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

मागील पाच दिवसांपासून दररोज जिल्ह्यात पाऊस पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT