maharashtra breaking news today 14 may 2024 Saam TV
महाराष्ट्र

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेचा महायुतीला जाहीर पाठिंबा

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (12 may 2024): महाराष्ट्रातील महत्वाच्या , लोकसभा निवडणूक, राजकारण आणि देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी, राजकीय घडामोडी लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर

Vishal Gangurde

कल्याण लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेचा महायुतीला जाहीर पाठिंबा

कल्याण लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश दाखिनकर यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत पाठींब्याचे पत्र दिले व अखिल भारतीय सेना महायुतीच्या पाठीशी असल्याचे सांगितले .यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अखिल भारतीय सेनेचे आभार व्यक्त केले.

पैठण तालुक्यात अवकाळी पावसाने वीज पडून ४ जनावरांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदलगाव येथे अचानक आलेल्या अवकाळी पावसाने विज पडून 4 जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने विज पडल्याने हि घटना घडली आहे.या घटनेची माहिती परिसरात पसरताच सर्व नागरिकांच्या वतीने हळहळ व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरे यांचा उद्या नाशिक दौरा, राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ घेणार सभा

ठाकरे गटाचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 7 वाजता पार पडणार सभा...

ऐन निवडणुकीत ठाकरे गटातुन ठाकरे गटाचे तत्कालीन लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे

तसेच ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांकडून तडीपारीची नोटीस देण्यात आली होती यावर उद्धव ठाकरे काय भाष्य करणार याकडे लक्ष...

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील यांना अखेर अटक

उत्पादन शुल्क विभागाच्या वॉन्टेड अधीक्षकाला एसीबीने अटक केली आहे. एका बियर शॉपीच्या परवाना प्रकरणी अधीक्षक संजय पाटील यांनी 2 अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने 1 लाख रु. ची लाच मागितली होती. कार्यालयातील निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना अटक करण्यात आली आहे.

रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा रंग आता चढू लागला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी आज जोगेश्वरी पूर्व भागात भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आलं. प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं कीर्तीकर यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो काढत हजारो शिवसैनिक या रोड शो मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळालं.

खारघर सेक्टर २१ मध्ये इमारतीला भीषण आग

नवी मुंबईतील खारघर सेक्टर २१ मध्ये इमारतीला आग

चतुर्भुज इमारतीच्या १५ व्या मजल्यावर आग

शॉकसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल

आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पिंपळगावमध्ये सभा , कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पिंपळगावमध्ये सभा

- ठाकरे गटापाठोपाठ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस

- महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस

- मोदींच्या दौऱ्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेता मोदींच्या दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी

डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना अटक

डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना केली सीबीआयने अटक

३४००० कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्या प्रकरणी अटक

या प्रकरणी सीबीआय ने केलं आहे आरोपपत्र दाखल

दिल्ली विशेष कोर्टात हजर केलं असता धीरज वाधवान यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

PM Narendra Modi Roadshow :  दामोदर पार्कपासून नरेंद्र मोदींच्या रोड शोची होणार सुरुवात

उद्या 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना भेटण्यासाठी येत आहे

उद्या भव्य दिव्य रोडशो करण्यात येणार आहे

घाटकोपर पश्चिम एलबीएस मार्गावरून दामोदर पार्क पासून याची सुरुवात होणार आहे

घाटकोपर पूर्व मधील गांधी अशियेड्स स्कूल कडे रोड शो समाप्त होणार आहे

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळाची गिरीश महाजन यांनी केली पाहणी

नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणारय. या सभेची जय्यत तयारी असून मंत्री गिरीश महाजन यांनी सभास्थळी भेट देवून तयारीचा आढावा घेत पाहणी केली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी मोदींची सभा होणार सभा यशस्वी करण्यासाठी भाजपसह महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच गिरीश महाजन पिंपळगावमध्ये दाखल झाले असून स्थानिक आमदारांसह महायुतीचे पदाधिकारी देखील सभेच्या तयारीचा आढावा घेतायत. मोदींची सभा कांदा पट्ट्यात होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेता सर्व खबरदारी घेण्यात येतेय.

नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांची सायकल रॅली

शांतिगिरी महाराजांनी स्वतः सायकल चालवत केला प्रचार

अपक्ष उमेदवार म्हणून शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या रिंगणात

शांतिगिरी महाराज यांनी शहरातील विविध भागात सायकल रॅली काढत केला प्रचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड

- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड

- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात आंदोलनाची पोलिसांना शक्यता असल्यानं पोलिसांची कारवाई

- पोलिसांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या ५ ते ६ पदाधिकाऱ्यांवर स्थानबद्धतेची कारवाई

- कांद्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्यानं कोणताही अनुचित घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोचा मार्ग

अशोक सिल्क मिल येथून रोड शो सुरु होईल

पुढे रोड शो सर्वोदय जंक्शन ओलांडून मार्गक्रमण करेल

एमजी रोड येथे डावे वळण घेऊन रोड शो घाटकोपर पश्चिमेकडून पूर्वेला जाईल

घाटकोपर पूर्वेकडे वल्लभ बाग जंक्शन येथे पोहचेल

याठिकाणी असलेल्या पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ रोड शो चा समारोप होईल

PM Narendra Modi : PM नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर १५ मे रोजी पिंपळगाव बसवंत- जोपुळे रस्ता असणार बंद

- पिंपळगाव बसवंत ते जोपुळे रस्ता उद्या १५ मे ला वाहतुकीसाठी बंद

- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत ते जोपुळे रस्त्यावर प्रवेश बंदी

- १५ मे ला सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पिंपळगाव बसवंत ते जोपुळे रस्त्यावर प्रवेश बंदी तसच रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

- वाहतूक कोंडी तसच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

- १५ मे ला पिंपळगाव बाजारसमितीच्या परिसरात मोदींची सभा

- कांदा पट्ट्यात मोदींची सभा होत असल्यानं प्रशासनाकडून विशेष खबरदारी

- सध्या कांद्याचा प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्यानं मोदींच्या सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

PM Modi's Roadshow In Kalyan : नरेंद्र मोदींच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबईतील घाटकोपर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या रोड शो पार पडणार आहे. या रोड शोचे नियोजन करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलुंड येथील कालिदास सभागृहात भाजप पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर रोड शो च्या मार्गात बदल होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. या बैठकीस खासदार मनोज कोटक,राम कदम, मंत्री सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

होर्डिंगवर कारवाई करण्यास महापालिकेकडून सुरुवात

इतर 3 होर्डिंग कारवाई करण्यास महापालिकेकडून सुरुवात...

तातडीने हे 3 होर्डिंग पाडण्यात येणार आहेत.

1 हजार 25 अधिकृत होर्डिंग मुंबईत आहेत.

त्या होर्डिंगना नोटीस पाठवणार आणि स्ट्रॅकचरल ऑडिट करून 10 दिवसाच्या आत अहवाल पाठवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

179 होर्डिंग रेल्वेच्या जागेत आहेत

ज्या होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत आहेत, त्यांना नोटीस देण्यात येणार आहे.

 महाराष्ट्रात आज उद्या मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावरील सुनावणी जुलैपर्यंत गुढे ढकलली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नाही.आता उन्हाळ्याच्या सुट्यानंतर या प्रकरणी सुनावणी होईल. म्हणजे जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी होईल

नरेंद्र मोदींचा 15 मे रोजी मुंबईत रोड शो, वाहतूक मार्गात करण्यात आलाय बदल

लोकसभेच्या शेवटच्या मतदान टप्प्यापूर्वी 15 मे रोजी मुंबईत पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूरच्या नरखेड तालुक्यात गारपिटीसह जोरदार पाऊस

नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मोवाड येथे गारपिटसह जोरदार पाऊस.

ढगाळ वातावरणानंतर पावसला सुरवात, यात लहान आकाराच्या गारा ही पडल्यात..

हवामान विभागाकडून माध्यस्वरूपचा पावसाचा इशारा दिला असतांना दुपारच्या सुमारास काही भागात पावसानं हजेरी

तरी काही भागात गारपीट झाली असून याचा फटका फळ बागांना बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेय

दिल्लीतील आयकर भवन इमारतीला लागली आग

घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 10 गाड्या दाखल

कार्यालयात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती

आगीच कारण अद्याप अस्पष्ट

अग्निशामक दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल

लातूरच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट

निलंगा, शिरूर- ताजबंद भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. दरम्यान दुपारी अचानक वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यातल्या निलंगा तसच शिरुर -ताजबंद भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे, घरगुती मुळे शेती पिकाचे देखील नुकसानझाल्याची माहिती समोर येत आहे..दरम्यान अचानक पाउस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पळापळ देखील झाली आहे, तर या भागातील विद्युत पुरवठा देखील काही काळ बंद झाला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

विधानपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार होती. राजकीय पक्षांच्या मागणीनंतर निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. १० जूनला निवडणूक होणार होती.

kangana ranaut News : कंगना रणौत यांनी भरला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज

भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना राणावत यांनी भरला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. मंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना कंगना यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित होते.

Pune News : पुणेकरांना दिलासा; शहरात तूर्तास पाणीकपात नाही

पुणे शहरात पाणी कपात तूर्तास नाही, असं स्पष्टीकरण महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. शहरात सध्या चौदाशे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे . नवलाखा हे मागच्या काही दिवसांपासून नजर कैदेत होते. सुरक्षेचा खर्च 20 लाख रुपये भरण्याची अट आहे. 2018 साली NIA ने त्यांना अटक केली होती. मागच्या काही महिन्यांपासून ते नजर कैदेत होते.

Ghatkopar Hording incident : पालकमंत्री लोढा यांच्याकडून घाटकोपर दुर्घटनाग्रस्तांना मदतीची घोषणा

घाटकोपर दुर्घटनाग्रस्तांना मदतीची घोषणा केली आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणून किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. ६० टक्क्यांपर्यंत अपंगत्व आलेल्यांना ७५ हजार रुपये देण्यात येणार आहे. ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना अडीच लाख रुपये देण्यात येणार आहे.

chiplun news : चिपळूणमध्ये अवकाळी पावसामुळे पेढांबेत केळीची बागेचं नुकसान

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील पेंढाबे गावात केळी बागेचं नुकसान

शेतकरी संतोष शिंदे यांची ही केळीची बाग

पाच एकरात त्यांनी २५ लाखांच्या केळीची लागवड केली होती

महिन्याभरात केळी चिपळूण बाजारपेठमध्ये विक्रीला जाणार होती

Nashik Breaking:  नांदगाव - संभाजीनगर रस्त्यावर बस आणि कारचा भीषण अपघात, तिनजण जागीच ठार 

बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. कार मधील तिघे जागीच ठार झाले आहेत. कार झाली चक्काचूर झाली आहे. नांदगाव - संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे अपघात घडला आहे.

Manoj Jarange :  मनोज जरांगे अंतरवालीत पुन्हा उपोषण सुरु करणार

मनोज जरांगे चार जूनपासून सकाळी नऊ वाजता अंतरवाली येथे उपोषण सुरू करणार आहे. दरम्यान, या उपोषणादरम्यान आठ जून रोजी नारायण गडावर सभा होईल. जरांगे यांच्याकडून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा उपोषण आणि आंदोलन करण्यात येणार आहे.

  Mumbai News : मुंबईतील अनधिकृत होर्डिंग पाडणार, पालिका करणार कारवाई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. घटनास्थळावरून उर्वरित तीनही अनधिकृत होर्डिंगवर काही वेळातच कारवाई होणार आहे. सर्वेक्षण करून काही वेळातच होर्डिंग पाडली जाणार आहेत. मुंबईत एकूण १०२५ अधिकृत होर्डिंग आहेत.

PM नरेंद्र मोदी दर्शनासाठी काल भैरव मंदिरात

पंतप्रधान मोदी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मोदी वाराणसीमध्ये रॅली काढणार आहेत. या आधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शनासाठी काल भैरव मंदिरात पोहोचले.

PM नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये जाहीर सभा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणात जाहीर सभा होत आहे. मोदींच्या स्वागतासाठी कल्याण सज्ज झाला आहे. या सभेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

Eastern Express highway : ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी आहे. होल्डिंग पडल्यामुळे ईस्टन एक्सप्रेस हायवेचा एक लेन बंद करण्यात आलेला आहे. यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतुक संत गतीने सुरू आहे

Mahabaleshwar Traffic :महाबळेश्वर पाचगणी वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त

महाबळेश्वर पर्यटकांनी सध्या हाऊसफुल

देश विदेशातील पर्यटकांची महाबळेशरात हजेरी

पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

या वाहतूक कोंडी मध्ये तासनतास पर्यटकांना अडकून पडावे लागत आहे.

आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभा घेणार

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातमध्ये आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार सभा घेणार आहे. वरळीच्या जबोरी मैदानामध्ये सभा पार पडणार आहे. उमेदवार यामिनी जाधव यांच्यासाठी जाहीर सभा होणार आहे. वरळी,लालबाग, परळ शिवडी या भागातील मराठी मते आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीचा प्रयत्न आहे. आज संध्याकाळी 8.30 वाजता नागरिकांना संबोधित करणार आहेत.

Salman Khan News : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

हरियाणाच्या फतेहाबादवरून गुन्हे शाखेने ही अटक केली आहे.

या आरोपीला मोक्का कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी एकूण अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा वर गेली आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे नाशिकमध्ये सभा घेणार?

नाशिकमधील वंचितचे उमेदवार करण गायकर यांच्यासाठी मनोज जरांगे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ जर महायुतीचा प्रचार करतात तर माझ्यासाठी जरांगे पाटील प्रचाराला येतील, असा दावा गायकर यांनी केला आहे. वंचितचे उमेदवार करण गायकर हे मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता.

Nashik News : नाशिकमध्ये उद्या PM नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा

नाशिकसाठी उद्या दिवस पॉलिटिकल ब्लॉकबस्टर ठरणार आहे. नाशिकमध्ये १५ मे रोजी नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. नाशिकच्या पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. तर त्याच दिवशी वणीमध्ये शरद पवार यांची आणि नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.

Pune Latest News : पुण्यात मतदानादरम्यान 57 ईव्हीएम मशीन बदलले

मुंबई : पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन बदलण्याची वेळ आली. दोन्ही मतदारसंघात प्रशासनाकडून 57 ईव्हीएम मशीन बदलण्यात आले. पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना 39 ईव्हीएम मशीन बदलण्याची वेळ आली, तर शिरूरमध्ये 18 ईव्हीएम मशीन बदलण्यात आले. तांत्रिक कारणामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT