Breaking : महाड पूर दुर्घटनेचा होणार अभ्यास; समिती गठीत! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Breaking : महाड पूर दुर्घटनेचा होणार अभ्यास; समिती गठीत!

महाडला भेडसावणारी पुराची समस्या आणि त्यावरील उपाय योजना यावर चर्चा करण्यासाठी आज महाड इथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : महाडला भेडसावणारी पुराची समस्या आणि त्यावरील उपाय योजना यावर चर्चा करण्यासाठी आज महाड इथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाडच्या पुराचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून 8 दिवसात आपला अहवाल सादर करेल.

हे देखील पहा :

आजच्या बैठकीत कोकण रेल्वेच्या पुलासाठी झालेल्या भरावामुळे महाडला पुराची समस्या भेडसावत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. त्यावर सर्वेक्षण करून उपाय योजना करा तसेच सावित्री नदीतील बेटे तातडीने काढून टाकण्यासाठी प्रक्रिया तातडीने सुरू करा अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिल्या.

यावेळी उपस्थित व्यापारी आणि नागरिकांनी पुरानंतर भेडसावणाऱ्या समस्यांसाठी शासकीय मदत, इन्शुरन्स क्लेम आदींबाबत समस्या मांडल्या. व्यापाऱ्यांना शासकीय मदतीचे आजपासून वितरण सुरू होईल असे सांगतानाच घरे, दुकाने, वाहने यांचे विमा क्लेम तातडीने पूर्ण करावेत अशा सूचना विमा कंपन्यांच्या अधिकाऱयांना दिल्या. आजच्या बैठकीला आमदार भरत गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पूर नियंत्रण समितीचे सदस्य, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला

Dating App: भयान वास्तव! डेटिंग अ‍ॅपवरचे ६५ टक्के युजर्स विवाहित अन् कमिटेड

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

High Blood Pressure: कोणतीही लक्षणं न दिसता होणारा आजार! हाय BPची कारणे वेळीच ओळखा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT