PCMC : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १५ स्थायी समिती सदस्यांना ACBची नोटीस!

पिंपरी-चिंचवड (PCMC) महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांना लाच लुचपत विभागाने नोटीस बजावली असून, चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १५ स्थायी समिती सदस्यांना ACBची नोटीस!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १५ स्थायी समिती सदस्यांना ACBची नोटीस!SaamTvNews

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांना लाच लुचपत विभागाने नोटीस बजावली असून, चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. महापालिकेतील एका ठेकदाराकडून दोन लाखांची लाच घेतल्या प्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना 18 ऑगस्ट २०२१ रोजी सापळा रचून अटक करण्यात आली होती.

हे देखील पहा :

लाचेची रक्कम स्थायी समितीतील सदस्यांच्या नावे घेत असल्याची बाब अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीत समोर आल्याने, स्थायी समितीतील इतर सदस्यांची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत विभागाने न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आता सर्व सदस्यांची चोकशी केली जाणार असल्याने या प्रकरणी आणखी काही खुलासे समोर येतायत का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १५ स्थायी समिती सदस्यांना ACBची नोटीस!
Facebook वरील ओळखीतून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तरुणीची फसवणूक!

कोण आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय स्थायी समिती सदस्य?

भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण १६ स्थायी समिती सदस्य आहेत. यापैकी भाजपचे १० व सहयोगी अपक्ष असे मिळून ११ सदस्य भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ सदस्य आहेत. तर, शिवसेनेचा एक सदस्य आहे.

भाजप सदस्य - नितीन लांडगे,  सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे व रवी लांडगे (रवी लांडगे यांनी राजीनामा दिला आहे.) भाजप संलग्न अपक्ष सदस्य नीता पाडाळे.

राष्ट्रवादी काँग्रेस - पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर

शिवसेना - मीनल यादव

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com