Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Nashik News : नाशिकच्या कळवण शहरातील गांधी चौकात मोकाट जनावराने मोटरसायकलला धडक देत लहान मुलाला पायदळी तुडवले. मात्र आईच्या धाडसी कृतीमुळे मुलाचे प्राण वाचले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या गांधी चौकात मोकाट जनावराने लहान मुलावर हल्ला केला.

  • आईच्या धाडसाने मुलाचे प्राण वाचले आहेत.

  • घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

  • घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त व्यक्त केला आहे.

  • मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एकीकडे नाशिकमधील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तर दुसरीकडे शहरात एका आईच्या धाडसाचा प्रत्यय कॅमेऱ्यात टिपला गेला आहे. कळवण शहरातील गांधी चौक परिसरातून जात असताना एका मुलाला मोकाट जनावरांनी पायदळी तुडवले. दरम्यान आईच्या धाडसी कृतीने मुलाचे प्राण वाचले आहेत. सदर घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह मोटारसायकलवरून गांधी चौकातून जात होता. अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या मोकाट जनावराने वेगाने धावत जाऊन थेट मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोटारसायकलवरील सर्वजण रस्त्यावर पडले. पत्नीने ताबडतोब आपल्या एका मुलीला उचलून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मात्र दुसरे लहान मूल रस्त्यावरच अडकले आणि त्या जनावराने त्या निरागस मुलाला पायदळी तुडवण्यास सुरुवात केली.

आईने आपल्या मुलाच्या जीवासाठी आर्त हाक दिली आणि धैर्य एकवटत थेट मोकाट जनावरासमोर उभी ठाकली. तिने जनावराला हाताने, शरीराने अडवून आपल्या मुलाला वाचवले. त्या क्षणी आजूबाजूचे नागरिक धावत आले आणि एकत्र येऊन जनावराला तेथून पळवून लावले.

या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. काही क्षणांसाठी त्या कुटुंबाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने आईच्या धाडसामुळे आणि नागरिकांच्या तातडीच्या मदतीमुळे एका मोठ्या दुर्घटनेपासून बचाव झाला. तथापि, या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून मोकाट जनावरांपासून संरक्षण मिळावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका निष्पाप मुलाच्या जीवावर आलेला प्रसंग आणि त्याच्या आईचे धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मात्र दुसरीकडे, शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न हा गंभीर असून त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर यापेक्षा मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT