Dombivli Hospital प्रदीप भणगे
महाराष्ट्र

हृदयद्रावक! लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

प्रदीप भणगे

मुंबई - बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवलीत (Dombivli) घडली आहे. सत्यम मौर्य अस या मुलांचं नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी (Police) पुढील तपास सुरू केला आहे. डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात.पत्नी एक मुलगा एक मुलगी अस त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी 10 वर्षाचा त्यांचा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला. (boy drowned in a pit dug for an elevator)

हे देखील पहा -

जवळपास दोन तास मुलगा घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेऊन ही सत्यम सापडला नाही. मग त्यांनी नजीकच्या इमारती मध्ये जाऊन बघितले तर इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते या पाण्यात सत्यमचा मृतदेह आढळून आला. सत्यमचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT