death saam tv
महाराष्ट्र

Nagpur: पनीरची पनोती! प्रियकराचा मृत्यू, तर प्रेयसीची प्रकृती गंभीर

हा फूड पॉयझनिंग चा प्रकार आहे की आणखी काही याबाबत पोलीस तपास करत आहेत.

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - पनीरची भाजी खाल्ल्यानंतर प्रियकराचा मृत्यु, तर प्रेयसीची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या (Nagpur) अजनी परिसरात ही घटना घडली आहे. रात्री या दोघांनी अजनी परिसरात एका हॉटेलमधून पनीरची भाजी घेतली. जेवण झाल्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले.

हे देखील पहा -

मात्र, जेवण झाल्यावर रात्री दोघांनाही उलट्या सुरू झाल्या, त्यामुळं दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्या तरुणाचा मृत्यू झाला. तर तरुणी गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रितीक खोब्रागडे असं मृत्यु झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. हा फूड पॉयझनिंग चा प्रकार आहे की आणखी काही याबाबत पोलीस तपास करत आहेत

ज्या हॉटेलमधून या दोघांनी खाद्यपदार्थ घेतले, त्या हॉटेलमधून अनेक ग्राहकांनी त्याचवेळी तीच भाजी अनेक लोकांनी खाल्ली. मात्र, रितिक आणि त्याची मैत्रिण वगळता अन्य कुणालाही काही त्रास झाला नाही. त्यामुळे हा फूड पाॅयझनचा प्रकार आहे की आणखी काही, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amboli WaterFalls : पावसाळ्यात एकदा तरी पाहाच आंबोलीतील 'हे' ठिकाण, जिथे धबधब्याचे पाणी खाली नव्हे तर वर उडते

Mumbai News : अभिनेत्याने केला १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update:पाकिस्तानी गुंडांशी संपर्काच्या संशयाने कोल्हापुरातील दोघे चौकशीसाठी ताब्यात

Maharashtra rain: राज्यात मान्सूनला मोठा ब्रेक; 'या' कारणामुळे गायब झाले ढग, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

Washim : निकाल लागला अन्...; शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य!

SCROLL FOR NEXT