दोन वर्षात यशवंत जाधव यांच्याकडून ३६ मालमत्ता खरेदी - किरीट सोमय्या

ED, कंपनी मंत्रालय, आयकर विभागद्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSaam Tv

रश्मी पुराणिक, सुमित सावंत

मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने धाड टाकली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी नंतर आता शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

या प्रकरणात आता किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) उडी घेतली आहे. आयकर विभागाच्या चौकशीत काही महत्वाची माहिती समोर आली आहे. याबाबद अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, असे असले तरी किरीट सोमय्यांनी ट्वीट करत याबाबाद खुलासा केला आहे.

हे देखील पहा -

ट्विट करत किरीट सोमय्य म्हणाले की, शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या. १००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. ED, कंपनी मंत्रालय, आयकर विभागद्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा असं ट्वीट सोमय्यांनी केलं आहे.

कोणत्या वर्षात किती मालमत्ता खरेदी ?

2020 - 07

2021 - 24

Kirit Somaiya
नवाब मालिकांनी मुंबईत बॉम्ब स्फोट घडवून आणले; श्वेता महालेंचा गंभीर आरोप

कोणत्या महिन्यात किती मालमत्ता खरेदी ?

मार्च 2020 - 1

डिसेंबर 2020 - 2

जानेवारी 2021 - 3

फेब्रुवारी 2021 - 2

मार्च 2021 - 5

मे 2021 - 1

जून 2021 - 2

जुलै 2021 - 6

ऑगस्ट 2021 - 2

डिसेंबर 2021 - 3

मालमत्तेचा पत्ता आणि किंमत

वॉटर फिल्ड 5 कोटी 10 लाख

क्रॉस रोड IV, वांद्रे

बिलखाडी चेंबर्स 2 कोटी

माझगाव

वाडी बंदर, माझगाव 1 कोटी 60 लाख

व्हिक्टोरीया गार्डन2 कोटी 20 लाख

भायखळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com