Dog Attack Saam tv
महाराष्ट्र

Dog Attack : रस्त्याने जाणाऱ्या महिलेवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; बोरिवलीत धक्कादायक घटना, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

Borivali News : कुत्र्याने महिलेच्या पायाचा लचका तोडला असून सुटका करण्याच्या प्रयत्नात महिला खाली पडली. यावेळी जवळच असलेल्या एका इसमाने कुत्र्याला हाकलत महिलेची सुटका केली

Rajesh Sonwane

संजय गडदे
मुंबई
: भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत जखमी केले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच घटना बोरिवली (प.) येथील ओल्ड एमएचबी कॉलनी परिसरात शनिवारी दुपारी घडली असून, रस्त्याने पायी जात असलेल्या एका महिलेवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून सदरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

बोरिवली (प.) मध्ये सदरची धक्कादायक घटना घडली आहे. मुळात मोकाट कुत्र्यांचा त्रास सगळीकडे वाढला आहे. पायी जाणारे तसेच मोटारसायकलवर जाणाऱ्यांची पाठलाग करत हल्ले केल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. लहान मुलांवर देखील हल्ले करत लचके तोडल्याचा घटना घडल्या आहेत. बोरिवलीत घडलेल्या या हल्ल्यात महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महिला गंभीर जखमी 
कुत्र्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओमध्ये महिला चालत असताना अचानक एक भटका कुत्रा मागील येत महिलेवर झेप घेताना दिसत आहे. या कुत्र्याने महिलेच्या पायाचा लचका तोडला असून सुटका करण्याच्या प्रयत्नात महिला खाली पडली. यावेळी जवळच असलेल्या एका इसमाने कुत्र्याला हाकलत महिलेची सुटका केली. 

नागरिकांमध्ये संतप्त भावना 

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे परिसरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ओल्ड एमएचबी कॉलनी परिसरातून जाताना विशेष काळजी घ्या. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मनपा अधिकाऱ्यांकडून तत्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT