Buldhana Accident News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Accident News: घर झालं पोरकं, पाहताही आलं नाही भावाला बहिणीचं लग्न; अपघातात जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News: सिमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला आपल्या बहिणीच्या लग्नातच मृत्यूने कवटाळलं आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldana News: बुलढाणा येथून मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटात व्हाव असं प्रत्येक भावाला वाटतं. यासाठी भाऊ संपूर्ण मेहनत घेतो. जीवाचं रान करून आपल्या बहिणीची पाठवणी करतो. मात्र सिमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला आपल्या बहिणीच्या लग्नातच मृत्यूने कवटाळलं आहे. या दुर्दैवी घटनेनं लग्न घरात शोककळा पसरली आहे. (Buldana Accident)

अधिक माहिती अशी की, लोणार तालुक्यातील सुलतानपूरच्या जवळच असलेल्या येसापूर येथीली भारतीय सैन्य दलाचे जवान विकास शालीकराम गायकवाड (वय ३० वर्ष) हे आपल्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी रजेवर आपल्या गावी बुलढाणा येसापूर येथे आले होते. बहिणीच्या लग्नामुळे ते फार आनंदी होते. गावी आल्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक व्यक्ती जखामी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर - संभाजीनगर हायवेवरुण अंजनी खुर्दकडून आपला मित्र किशोर शंकर धांडे (वय ३४) यांच्या सह दुचाकीने ते घरी परतत होते. यावेळी भानापुर जवळ अज्ञात वाहणाच्या धडकेत सैनिक विकास गायकवाड जागीच ठार झाले. तर त्यांचा मित्र किशोर धांडे गंभीर जख्मी असून मेहकर येथील हाऊस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतक जवान विकास यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी, पत्नी आई वडील असा मोठा परिवार आहे. विकास पाच वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच विकास यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र FDA ची राज्यभर धडक कारवाई; 9.76 कोटींचा संशयित अन्नसाठा जप्त

ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत काय ठरणार? भारतासाठी का महत्त्वाची आहे अमेरिका-चीन चर्चा?

IAS अन् IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या कोण करतं? कोणाकडे आहे इतकी मोठी पॉवर?

Toenails Turn Black: पायांची नखं अचानक काळी-पिवळी पडतायत? जाणून घ्या यामागची ३ प्रमुख कारणे

दिवसभरात किती कॉफी पिऊ शकता? जास्त कॉफी प्यायल्यानं काय होतं?

SCROLL FOR NEXT