ठाणे महानगरपालिकेतील रखडलेल्या निवडणुकांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
पाच प्रमुख समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश
स्थायी समिती, परिवहन समिती आणि शिक्षण समितीच्या निवडणुका प्रलंबित
मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मोठा दणका दिलाय. महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुका आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड रखडवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने शिंदे गटाला फक्त 8 आठवड्यांचा वेळ दिलाय. यावेळेत त्यांना पाच प्रमुख पालिका समित्या आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे सक्त आदेश न्यायालयाने दिलेत.
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन अनेक महिने उलटलेत, तरी पालिकेची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती तसेच परिवहन समिती, शिक्षण समिती यांसारख्या एकूण पाच प्रमुख समित्यांच्या सभापती आणि सदस्यांच्या निवडणुका अद्याप पार पाडल्या नव्हत्या. यासह महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवडही रखडवण्यात आली होती. या दिरंगाईविरोधात वकील सागर कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली यात न्यायालयाने ठाणे महापालिकेला 8 आठवड्यांच्या आत सर्व निवडणुका पूर्ण घेण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेच्या सत्तेला पाठिंबा दिलाय. परंतु शिवसेना जाणीवपूर्वक किंवा राजकीय कारणांमुळे स्वीकृत नगरसेवक आणि विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर करत नसल्याची चर्चा होऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर, कोर्टात दाखल झालेल्या या याचिकेमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय.
न्यायालयाच्या या आदेशामुळे ठाणे महापालिकेला पुढील दोन महिन्यांच्या आत स्थायी समितीसह पाच समित्यांच्या निवडणुका घेणे बंधनकारक झाले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.