akola, Former Minister Sanjay Dhotre, Akola Railway Station saam tv
महाराष्ट्र

Maharashtra : माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरात ठेवलाय बाॅम्ब; रेल्वे उडवून देण्याची मिळाली धमकी

धोत्रे यांच्या घराबाहेर पोलिस तैनात केल्यानंतर अखेर ती अफवा ठरली.

साम न्यूज नेटवर्क

अकोला : रेल्वेत बाॅम्ब असल्याचा एक फाेन पाेलिसांना (police) आल्याने क्षणार्धात पाेलिसांनी अकाेला (akola) रेल्वे स्टेशन गाठले. त्यांच्यापाठाेपाठ बाॅम्ब शाेधक पथक पाेहचले. या पथकाने रेल्वे स्टेशनवरील गाडीची (railway) तपासणी केली. यावेळी पाेलिसांच्या हाती काहीच लागले नाही. ही घटना (akola railway station news) मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. (Akola Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी मंगळवारी (ता. 26 जूलै) संध्याकाळी पोलिसांना एक फाेन आला की रात्री साडे नऊ वाजता अकोला रेल्वे स्टेशनवर पोहचणाऱ्या रेल्वे गाडीत बाॅम्ब ठेवण्यात आला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे (sanjay dhotre) यांच्या घरासमोर बाॅम्ब लावले आहेत.

त्यानंतर शहरातील सर्व पोलिस अलर्ट झाले. पाेलिसांनी रेल्वे स्टेश गाठले. काही वेळेतच बाॅम्ब शोधक पथक देखील दाखल झाले. या पथकाने रेल्वे स्टेशनचा परिसर पिंजून काढला. प्रत्येकाची चाैकशी केली.

akola railway station

त्यानंतर रेल्वे स्टेशनवर आलेल्या गाडीची संपूर्ण तपासणी केली. याचं वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घराची तपासणी केल्यानंतर काहीच सापडले नसल्याने गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. धोत्रे यांच्या घराबाहेर पोलिस तैनात केल्यानंतर अखेर ती अफवा ठरली. फेक फोन काॅल करणाऱ्यांचा पोलिस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Akola Railway Station

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT