shilpa - raj kundra Saam tv news
महाराष्ट्र

शिल्पा शेट्टी अन् राज कुंद्राविरूद्ध गुन्हा; ६० कोटींची आर्थिक फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

Shilpa Shetty Raj Kundra 60 crore scam: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ६०.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप. तक्रारदार दीपक कोठारी यांनी गुंतवणुकीचे पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा आरोप केला. हे प्रकरण Best Deal TV Pvt. Ltd कंपनीशी संबंधित आहे.

Bhagyashree Kamble

  • शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ६०.४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप.

  • तक्रारदार दीपक कोठारी यांनी गुंतवणुकीचे पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा आरोप केला.

  • हे प्रकरण Best Deal TV Pvt. Ltd कंपनीशी संबंधित आहे.

  • आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी, आरोप फेटाळले असल्याचा वकिलांचा दावा.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिल्पा आणि राज यांच्यासह एका अज्ञात व्यक्तीवर तब्बल ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबईतील एका व्यावसायिकाची ६०.४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार दीपक कोठारी हे मुंबईतील व्यावसायिक असून, Lotus Capital Financial Services या कंपनीचे संचालक आहेत. हे प्रकरण त्यांच्या Best Deal TV Pvt. Ltd या ऑनलाईन शॉपिंग कंपनीशी संबंधित आहे. कोठारी यांच्या तक्रारीनुसार, २०१५ साली शिल्पा आणि राज यांनी कंपनीचा विस्तार करण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली, मात्र ती रक्कम व्यवसायाऐवजी वैयक्तिक खर्चासाठी वापरली.

कोठारी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी १२ टक्के व्याजदराने ७५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. मात्र, टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक स्वरूपात पैसे देण्याचा सल्ला शिल्पा-राज यांनी दिला. त्यानुसार, एप्रिल २०१५ मध्ये ३१ कोटी आणि सप्टेंबर २०१५ मध्ये २८ कोटी रुपये त्यांनी गुंतवले. या रकमेवर शिल्पा आणि राज यांनी वैयक्तिक हमी दिली होती.

मात्र, २०१६ मध्ये शिल्पानं संचालक पदाचा राजीनामा दिला आणि कंपनीविरुद्ध १.२८ कोटींच्या दिवाळखोरीचे प्रकरण उघड झाले. कोठारी यांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची गुंतवणूक बुडाली. पैसे परत न मिळाल्याने त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि शिल्पा-राज विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

प्रकरणाची रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने ते आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. शिल्पा-राज यांच्या वकिलांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या पुढील तपास सुरू असून, न्यायालयीन सुनावणीवर लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, बांगलादेशाने आयात बंदी हटवली

Banana Mask: केसांच्या वाढीसाठी 'असा' करा केळीच्या सालीचा वापर, वाचा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत

Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT