Mumai Crime News SaamTv
महाराष्ट्र

Mumbai Crime: मुंबईत आढळला झाडाला लटकलेला मृतदेह; हत्या की आत्महत्या? गुढ कायम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर रोड 5 आणि 6 जवळील 151 येथील मोकळ्या जागेवरील झाडावर हा मृतदेह लटकत्या अवस्थेत होता.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईच्या जुहू परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह आता वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे. (Latest Mumbai Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर रोड 5 आणि 6 जवळील 151 येथील मोकळ्या जागेवरील झाडावर हा मृतदेह लटकत्या अवस्थेत होता. जुहू पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ताब्यात घेतला. तसेच विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल केला आहे.

इथे मृतदेहाची वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन केले जाणार आहे. आरीफ इसाक इरुस हाझी (४२ वर्षे)असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली असून ही हत्या आहे की, आत्महत्या याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच माहिती मिळू शकणार आहे. मात्र परिसरात अशा पद्धतीने व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

बटण पसंतीच्या उमेदवाराचं दाबलं अन् लाइट पेटली भलतीकडे; संतापलेल्या मतदाराने ईव्हीएम फोडलं

Local Body Election: आता थेट निवडणूक आयोगाला कोर्टात खेचणार; निलेश राणेंचा मोठा निर्णय

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

SCROLL FOR NEXT