Beed नगरपालिकेत स्वच्छतेचे टेंडर घेणाऱ्या कंपनीला काळया यादीत टाका; आपची मागणी
Beed नगरपालिकेत स्वच्छतेचे टेंडर घेणाऱ्या कंपनीला काळया यादीत टाका; आपची मागणी विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed नगरपालिकेत स्वच्छतेचे टेंडर घेणाऱ्या कंपनीला काळया यादीत टाका; आपची मागणी

विनोद जिरे

बीड : बीड शहरामध्ये नगर पालिकेने ज्या कंपनीला स्वच्छतेचे टेंडर दिले आहे, ती कंपनी चांगल्या प्रकारे काम करत नाही. त्यामुळं शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच अमृतवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीपात्रात देखील टाकलेल्या कचऱ्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे.

हे देखील पहा :

या कंपनीवर तात्काळ कारवाई करून कंपनी काळ्या यादीत टाका. अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. तर, या सर्व कामाकडे नगरपालिका प्रशासन डोळे व कान बंद करून बघ्याची भूमिका घेत आहे. यावरून शंका होती, की भूमाफिया आणि नगरपालिका प्रशासन व कचरा उचलणारी कंपनी या सगळ्यांचं साटंलोटं असून जिथे ओपन स्पेस भेटेल तेथे कचरा टाकला जातो.

या सर्व मिलीभगतीच्या विरोधात आम आदमी पार्टी आता आक्रमक झाली असून सदरील कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाका; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, ज्ञानेश्वर राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

May Month Born Babies: मे महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात हे खास गुण; जाणून घ्या

Babara Ramdev News : बाबा रामदेव यांना धक्का, पतंजलीच्या 14 उत्पादनावर बंदी

Colon Cancer : कोलोरेक्टल कर्करोग कसा होतो? जाणून घ्या याच्या विविध टप्प्यांविषयी

Namrata Sambherao : नम्रता संभेरावचा खास लूक पाहिलात का ?

Samay Shah Interview : 'ते डिप्रेशनमध्ये नव्हते, त्यांना...'; गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर ऑनस्क्रिन मुलाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT