Tension in BJP-Shiv Sena alliance before municipal elections; Shinde faction MLA Sanjay Shirsat gave a warning. saam tv
महाराष्ट्र

BJP- Shiv Sena Yuti: भाजप- शिवसेनेच्या युतीमध्ये कोण घालतोय खोडा? लवकर निर्णय घ्या नाहीतर...,शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर इशारा

Chhatrapati Sambhajinagar Politics: महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप-शिवसेना युतीत तणाव निर्माण झालाय. महापालिका निवडणुकीपूर्वी जागावाटपाबाबत लवकर निर्णय घेण्याचा इशारा शिंदे सेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजपला दिलाय.

Bharat Jadhav

  • महायुतीच्या मोठ्या विजयानंतर भाजप–शिवसेना युतीत तणाव निर्माण झालाय.

  • जागावाटपावरून चर्चा अंतिम टप्प्यात अडकली आहे.

  • शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा भाजपवर आरोप

नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवला. आता महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीबाबत बोलणी चालू असून चर्चा अंतिम टप्प्यात आलीय. मात्र नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत ज्या जागांवर निसटता विजय झाला असेल, तर त्या जागांवर भाजपनं दावा केलाय. त्यामुळे चर्चा अजून पूर्ण झाली नाहीये. त्याचदरम्यान शिंदे गटाच्या आमदारानं युतीसंदर्भात भाष्य केलंय. युती न होण्यामागे भाजपचे नेते जबाबदार असल्याची टीका शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलीय.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी शिवसेना-भाजपमध्ये युतीची बोलणी चालूय, पण काही कारणामुळे ही चर्चा रखडली आहे. मोठा भाऊ कोण? छोटा भाऊ कोण? या वादामुळे महापालिकेतील युतीची बोलणी रखडलीय. बैठकांवर बैठका सुरू आहेत, पण तोडगा निघताना दिसत नाहीये. भाजपमधीलच काही नेते युतीमध्ये मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय.

जास्त ताणू नका, नाहीतर जनता आपल्याला ताणवेल, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय. भाजपमधील कोणते नेते युतीत खोडा घालत आहेत. असा प्रश्न केला जातोय. दरम्यान भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेला २०१५ चा फॉर्म्युला आता चालणार नाही. ५०-५० वर चर्चा झाली तरच युती होईल? अन्यथा राज्यातील वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्ही मान्य करू, अशी ताठर भूमिका घेतलीय.

दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यात भाजपचे केवळ दोनच नगराध्यक्ष निवडून आलेत. हा मुद्दा शिवसेनेने पुढे केलाय. याशिवाय आमचा एक खासदार, सहा आमदार आहे, त्यामुळे संभाजीनगर महापालिकेत आम्हीच मोठा भाऊ असल्याचा दावा शिसेनेने केलाय.

भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेला २०१५ चा फॉर्म्युला आता चालणार नाही, तर फिप्टी फिप्टीवर चर्चा झाली तरच युती होऊ शकेल? नाहीतर राज्यातील वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्ही मान्य करू, अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे भाजपला स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे. तर शिवसेने युतीसाठी भाजप नेत्यांना संपर्क करणं चालूय.

भाजपमधील काही नेते आहेत, जे युतीमध्ये मीठाचा खडा टाकत आहेत. त्यांना खड्यासारखे बाजूला करा आणि लवकर युतीचा निर्णय होणे गरजेचं आहे, असं शिरसाट म्हणालेत. दरम्यान आज किंवा उद्या युती संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची लाट! २९ महापालिकांवर झेंडा, शिंदे-पवारांची गरज कुठे? ठाकरे बंधूंना किती जागा? पाहा महा एक्झिट पोलचा अंदाज

Trendy Kurta Desing: कॅज्युअल आणि ऑफिस वेअरसाठी ट्राय करा 'हे' सुंदर ट्रेंडी कुर्ता

Saam Tv Exit Poll: मुंबईमध्ये महायुतीची सत्ता? भाजप सर्वात मोठा पक्ष, ठाकरे बंधूंचे काय होणार?

Municipal Elections Voting Live updates : सोलापुरात मतदानच्या शेवटच्या वेळी दोन गटात भांडण

Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! येत्या १८ जानेवारीला होणार वाहतुकीत मोठा बदल; वाचा नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT