जयंत पाटील  SaamTV
महाराष्ट्र

तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून पैसे उकळण्याचे भाजपचे काम : जयंत पाटील

केंद्र सरकार आणि भाजपा केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करत आहे. हे आता आर्यन खानच्या प्रकरणात झालेल्या पैशांच्या मागणीवरून स्पष्ट होत आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे : केंद्र सरकार आणि भाजपा केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करत आहे. हे आता आर्यन खानच्या प्रकरणात झालेल्या पैशांच्या मागणीवरून स्पष्ट होत आहे. यातून खरी वस्तुस्थिती बाहेर येईल, असं वक्तव्य जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत केलं, राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते रविवारी ठाण्यात आले होते. आर्यन खान प्रकरणात जर समीर वानखडेकडून पैसे मागितले गेले असेल तर ती गंभीर बाब आहे. त्यातही सापडलेले अंमली पदार्थ खरे होते का? ते तिथे कसे पोहचले? कोणी ठेवले होते का? आदी प्रश्न यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केले. विशेष म्हणजे  यानंतरचा जो घटनाक्रम आहे. ज्यात  भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या जवळचे लोक ज्यांना पकडलं आहे. 

हे देखील पाहा :

त्यांचा हात धरून बाहेर आणतांना दिसत आहेत. त्यानंतर अशा प्रकारे जर पैश्याची मागणी कोण करत असेल तर यात बरेच लोक असण्याची शक्यता असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणूनच लढण्यालाच आमचं पाहिलं प्राधान्य असेल. पण, स्थानिक पातळीवर आघाडीचं जुळणं आवश्यक असतं तीनही पक्ष राज्यात सत्तेत एकत्र असल्याने  सगळ्यानी एकत्र असावे याकरिता आमचे प्रयत्न असतील असं पाटील पुढे म्हणाले.

वाढत्या नागरी व्यवस्थेला पाणी कमी पडू लागलं ही वास्तवता आहे. सगळ्याच नागरी व्यवस्था इतक्या वेगाने वाढत आहेत कि आपल्याकडे उपलब्ध असणारी धरणे हळूहळू पाणी पुरवठ्यासाठी कमी पडू लागली आहेत. पण यावर उपायोजना करण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर कसा करायचा यांदर्भात चर्चा सुरु आहे. त्यावर सोमवारी ठाण्यात घेण्यात येणाऱ्या आढावा बेठकीत चर्चा करू असं पाटील म्हणाले.

ठाण्यात लसीकरणावरून झालेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना वादाबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता. लस दिल्लीहून केंद्र सरकारच्या माध्यमातून आली असल्याने त्याच श्रेय कोणी घेऊ नये असा टोला पाटील यांनी शिवसेनेला लगावला. तर येत्या दोन ते तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होईल.  यात काही आमच्यातून गेलेल्या व्यक्तींबरोबर भाजपातीलही काही जणांचा समावेश असेल असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT