सुनीता गोकुळ दौंड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे
सुनीता गोकुळ दौंड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे Saam Tv
महाराष्ट्र

मुंडे समर्थक नाराज; राजीनाम्याचं लोण अहमदनगरपर्यंत

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर: खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रात मंत्रीपद न दिल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या विद्यमान पंचायत समिती सभापती सुनीता गोकुळ दौंड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या बरोबर नेहमी अन्याय होत आहे.

याचा निषेध आणि माजी मंत्री पंकज मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ पाथर्डी पंचायत समिती सभापती सुनीता दौंड तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिला आहे. रणजित बेळगे,अर्जुन धायतडक यांनी सुद्धा आपला भाजपा सक्रिय कार्यकारणी सदस्य पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्याकडे दिले आहे.

दरम्यान, खासदार प्रीतम मुंडेंना (MP Pritam Munde) मंत्रीपदापासून डावलल्याने, बीडमध्येही भाजप पदाधिकारी असणारे पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. भाजपकडून (BJP) मुंडे भगिनींवर अन्याय केला जात असून जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जात आहे. याचाच निषेध म्हणून आम्ही राजीनामे देत आहोत, असं म्हणत गेल्या 2 दिवसांपासून आतापर्यंत तब्बल 47 जणांनी राजीनामे दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India News: मोठी बातमी! एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवाशांचा खोळंबा; नेमकं कारण काय?

Hindu Religion: कपाळावर टिळा लावण्याचे हे नियम जाणून घ्या

Nashik Crime: युवकाच्या खूनानंतर रोकडोबावाडीत उडाली एकच खळबळ, पाेलिसांचा रात्रीत फाैजफाटा दाखल

Today's Marathi News Live : प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात; शरद पवारांचं मोठं भाकित

Pregnancy Care: गरोदरपणात कोणत्या फळांचा आहारात सामवेश करावा?

SCROLL FOR NEXT