chandrapur politics  Saam tv
महाराष्ट्र

Explainer : काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना चंद्रपुरात भाजपचा महापौर कसा झाला? पडद्यामागं नेमक्या काय घडामोडी घडल्या?

chandrapur politics : काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना चंद्रपुरात भाजपचा महापौर झाला आहे. ठाकरे गटाच्या साथीमुळे भाजपचा महापौर झाला आहे.

Saam Tv

चंद्रपुरात राजकीय घडामोडींना वेग

महापौर निवडीत भाजपचा एक मताने विजयी

ठाकरे गट ठरला किंगमेकर

चंद्रपुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. चंद्रपुरात भाजपला महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यात यश आलं आहे. चुरशीच्या लढाईत भाजपने एका मताने विजय प्राप्त केला आहे. भाजपला एक मत अधिक मिळाल्याने संगीता खांडेकर महापौर झाल्या आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपचा महौपार कसा झाला, याची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाची भूमिका किंगमेकर ठरली.

चंद्रपुरात ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले आहेत. उपमहापौरपदाच्या वेळी दोघांना ३२ मते मिळाली होती. ठाकरेंचे प्रशांत दानव आणि काँग्रेसचे पप्पू देशमुख यांना प्रत्येकी ३२ मते मिळाली होती. त्यानंतर उपमहापौरपदासाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यावेळी दानव यांचं भाग्य उजळलं.

चंद्रपुरातील निवडणुकीत निकालानंतर त्रिशंकू अवस्था झाली होती. या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या ठाकरे सेनेच्या हाती होत्या. ठाकरे गटाने महापौर पद मिळावे, यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. ठाकरे गटाने महापौरपदासाठी काँग्रेसशी बोलणी केली होती. परंतु दोघांची युती होऊ शकली नाही. शेवटच्या क्षणीही दोन्ही पक्षात बोलणी झाली. परंतु अंतिम क्षणी दोघांची बोलणी फिस्कटली. त्यानंतर आमदारांची ठाकरे गटाच्या नेत्याशी चर्चा झाली. त्यावेळी दोघांमध्ये सव्वा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला नक्की झाला. दोघांनी सहमती दर्शवल्यानंतर दहा वाजता युती जाहीर केली.

दोघांच्या युतीने काँग्रेसला धक्का बसला. सदस्य सभागृहात जाताना काँग्रेसने ठाकरे गटाचे मन वळण्यात फार उत्साह न दाखवल्याने हातची संधी गमावली. या निवडणुकीत एमआयएमचे सदस्य अझर शेख यांच्या भूमिकेने बुचकळ्यात पाडले. त्यांनी महापौर निवडीत तटस्थ भूमिका घेतली होती. तर उपमहापौर निवडीत काँग्रेसच्या आघाडीला समर्थन दिलं.

काँग्रेसचे बंडखोर प्रशांत दानव यांनी ठाकरे गटात प्रवेश करत उपमहापौरपद मिळवलं. राज्यात ठाकरे गटाची भूमिका भाजपविरोधी असतानाही भाजपविरोधी असली तरी भाजपला समर्थन दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीनेही सभागृहाबाहेर राहून भाजपला मतदान केल्याचे दिसून आले.

आज सकाळपासून सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडी सदस्य सभागृहात जाईपर्यंत सुरू होत्या. पण काँग्रेसने ठाकरे गटाचे मन वळवण्यात फार उत्साह न दाखवल्याने हातची संधी या पक्षाला गमवावी लागली. या सर्व घडामोडीत MIM चे सदस्य अझर शेख यांच्या भूमिकेने सर्वांना बुचकळ्यात टाकले. त्यांनी महापौर निवडीत तटस्थ भूमिका घेतली, तर उपमहापौर निवडीत काँग्रेस आघाडीला समर्थन दिले.

दुसरीकडे काँग्रेस बंडखोर प्रशांत दानव यांनी ऐनवेळी ठाकरे सेनेत प्रवेश करीत उपमहापौर पद मिळवले. राज्याच्या राजकारणात ठाकरे सेनेची भूमिका भाजपविरोधी असली, तरी इथे मात्र त्यांनी भाजपला समर्थन दिल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. वंचितने मात्र सभागृहाबाहेर राहून एकप्रकारे भाजपला मदतच केल्याचे पाहायला मिळालं.

महापौर निवडणुकीतील बलाबल

भाजप 23

शिंदे सेना 1

ठाकरे सेना 7

अपक्ष 1

एकूण 32

____________

काँग्रेस 27

जनविकास सेना 3

बसप 1

एकूण 31

वंचित बहुजन आघाडीची चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त

वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखालील चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीने अधिकृत पत्र जारी केले आहे. वंचितचे दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या वेळी हे दोन्ही नगरसेवक गैरहजर राहिले. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक कारवाई करत शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या सिम कार्डमध्ये सोनं? सिमकार्डमधील सोनं विकून 27 लाख कमावले?

Wednesday Horoscope : मन अस्वस्थ होईल, अडचणीत याल; 5 राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

राष्ट्रवादीचं विलिनीकरण दिल्लीत ठरणार? फडणवीसांचा दिल्ली दौरा, चर्चांना उधाण

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांचे मेगा ड्राईव्ह! "ट्रिपल सीट" चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीतील पहिलीच मंत्रिमंडळ बैठक; बारामतीसह पुणे जिल्ह्यासाठी घेतले ३ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT