डॉ. सुजय विखे पाटील
डॉ. सुजय विखे पाटील 
महाराष्ट्र

दिवाळीनंतर राज्यात फटाके वाजवू, विखेंच्या विधानाने "धमाका"

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कर्जत तालुक्यात पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहे. आपापल्या पक्षात नवीन भरती सुरू झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही भरती सुरू झाली आहे. हा खरे तर कर्जत भाजपसाठी एक प्रकारे धक्काच आहे. चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्यानंतर झालेल्या गळतीमुळे चर्चा सुरू झाली होती. भाजपच्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी हाती घड्याळ बांधल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. BJP will come to power in Maharashtra after Diwali abn79

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाविकास आघाडीबद्दल मोठा धमाका केला आहे. त्यांनी सरकार पाडण्याबद्दल दिलेल्या तारखेमुळे सोशल मीडियात चवीने चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने डॉ. विखे यांनी हा खुलासा केला आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत जिल्हा बँकेची पुनरावृत्ती होईल, असेही त्यांनी सांगून टाकले.

भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक लालासाहेब शेळके, देविदास खरात आणि नगरसेविका मंगल तोरडमल यांचे पुत्र नितीन तोरडमल यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे सृजन हाऊसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्या घरी सुखी रहा. थोडं थांबा, कुणी कुठंही जाऊ द्या, दिवाळीनंतर फटाके वाजवायला तयार रहा, असे सांगून विखे पाटील यांनी जास्त बोलण्याचे टाळले. BJP will come to power in Maharashtra after Diwali abn79

या वेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, किसान सेलचे सुनील यादव, सरपंच काकासाहेब धांडे आदी उपस्थित होते.

खेडकर यांच्यामुळे विकासपर्व

कोरेगाव गटात आंबीजळगाव, निंबे, खातगाव दलित सुधार योजना, चापडगाव, दिघी, निमगाव डाकू येथील विविध विकासकामांचे उदघाटन डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जि.प. सदस्य खेडकर यांच्या विकास निधीतून ही कामे करण्यात आली आहेत. खेडकर यांच्यामुळे गटातील प्रत्येक गावास किमान पन्नास लाख ते एक कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. गटाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत.

असं नाही, तसं म्हणालो...

विखे पाटील यांच्या विधानामुळे सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीबद्दलच्या विधानाचा विपर्यास झाला आहे. आमच्या कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसं म्हणालो, असा खुलासा त्यांनी केला आहे. कर्जतमध्ये टक्केवारीराज सुरू आहे. तेथे महाविकास आघाडीचे आमदार आहेत, असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. विधानसभेपूर्वी विखे पाटील यांनी बारा-झिरो करू अशी वल्गना केली होती. आता सरकारबद्दल विधान मागे घेतल्याने ते ट्रोल होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT