BJP Shinde Sena face off in Mumbai District Central Cooperative Bank election saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गट आमनेसामने; मुंबई बँकेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटले!

BJP-Shinde Sena Face-Off : सत्तेत वाटेकरी असलेले महायुतीमधील भाजप आणि शिंदे गट शिवसेना आमनेसामने आलेत. शिंदे गट 'मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके'च्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवण्याच्या तयारीत आहे. या क्षेत्रात भाजपचे वर्चस्व मानले जाते. परिणामी, हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.

Bharat Jadhav

  • शिंदे गटाकडून निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी

  • मुंबईतील सहकारी क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला

  • सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील दोन घटकांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय संघर्ष

राज्याच्या महायुती सरकारमध्ये खळबळ उडवून देणारी बातमी हाती आलीय. शिंदे गट आणि भाजप आमनेसामने आले असून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहेत. सत्तेत वाटेकरी असणारे भाजप आणि शिवसेना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांसाठी आमनेसामने आलेत. सहकारी क्षेत्रावरील नियंत्रण आपल्याकडे राहण्यासाठी दोन्ही पक्षांकडून पूर्ण ताकद पणाला लावली जात आहे. बँकेच्या निवडणूक जरी असली तरी हे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता यातून व्यक्त केली जातेय.

मध्यमवर्गीय मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

कारण या निवडणुकीतून शिंदे गट मध्यमवर्गीय मतदारांपर्यंत पोहोच वाढवण्याचा प्रयत्नात आहे. महाराष्ट्रात सहकारी बँकांवरील नियंत्रण म्हणजे केवळ आर्थिक अधिकार नव्हे, तर तळागाळातील राजकारणावर मजबूत पकड असणं असं मानलं जातं. सुमारे १०,२८२ कोटी रुपयांचे खेळते भांडवल असलेल्या या 'मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके'कडून दरवर्षी ६०० ते ७०० कोटी रुपयांची गृहकर्जे दिली जातात.

यासह ही बँक सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन, तसेच गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं-पुनर्विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी पुरवत असते. या बँकेवर नियंत्रण मिळवल्यास मुंबईतील विशाल मध्यमवर्गीय मतदारवर्गापर्यंत थेट पोहोचणे शक्य होत असतं. शिंदे गट बरोबर तेच समीकरण डोक्यात ठेवत या निवडणुकीत उतरत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे सर्वाधिकार घेतलेत. म्हणजेच मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानंतरही अंतिम निर्णय फडणवीसांचा असणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यांना दिल्या जाणाऱ्या निधी वाटपावरही मुख्यमंत्री कार्यालयाचं लक्ष असणार आहे. त्यामुळे महायुतीमधील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कूजबूज सुरूय. आता शिवसेनेने मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उतरत भाजपला टक्कर देण्याचं ठरवलं असल्याचं बोललं जातंय. कारण या निवडणुकीत आतापर्यंत भाजपचे वर्चस्व आहे. तरीही आता शिंदे यांची शिवसेनेही रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. परिणामी, भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे.

भाजपला एकनाथ शिंदेंचं आव्हान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी सुरू केलीय. दरम्यान या बँकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा प्रभाव आहे. ठाणे-पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठं यश मिळालं होतं. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून आता शिंदे गटाने मुंबई मध्यवर्ती बँकेत सत्ता मिळवण्यासाठी तयारी सुरू केलीय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे.

सध्या या बँकेच्या संचालक मंडळात २० सदस्य आहेत. यात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि त्यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. या संचालक मंडळात प्रसाद लाड आणि तेजस्वी घोसाळकर यांसारख्या भाजप नेत्यांचा, तसेच ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा प्रवेश भाजपच्या दीर्घकालीन वर्चस्वाला थेट आव्हान ठरतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT