BJP survey-based candidate selection formula Saam Tv
महाराष्ट्र

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

BJP Survey Formula: राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलयं... अशातच महापालिका लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायाला मिळतेय... या गर्दीत आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक जण प्रयत्नाची पराकष्ठा करतातय... अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेकडून एकेका प्रभागात 20 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत....त्यामुळे नेमकं कोणाला उमेदवारी द्यावी यासाठी पक्षासमोर मोठं आव्हान आहे... मात्र उमेदवारी देण्याआधी भाजपनं नवा फॉर्म्युला शोधून काढलाय.

Suprim Maskar

भाजपच्या या फॉर्म्युलामुळे एक तर बंडखोरी रोखण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे एकाच प्रभागातले सर्व इच्छुक एकत्रितपणे मतदाराच्या दारी जाऊन नाव नव्हे चिन्ह पाहा ही घोषणा देत आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदावाराला विरोध करणं इतर इच्छुकांना अवघड होणार आहे.

प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवार एकत्र मतदारांसमोर जातायत

ज्याला तिकीट मिळेल त्याला मतदान करण्याचं आवाहन इच्छुक करतायत

मतदार सगळ्या इच्छुक उमेदवारांची पडताळणी करतील

कोणता उमेदवार योग्य हे मतदारांच्या लक्षात येईल

त्यानंतर पक्षाकडून होणाऱ्या सर्वेक्षणात योग्य उमेदवार मतदार ठरवतील

सर्वेक्षणाच्या आधारेच निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवाराला तिकीट मिळेल

अनेकदा तिकीट न मिळाल्याची नाराजी आणि अंतर्गत वादामुळे पक्षातील इच्छुकांकडून बंडखोरी केली जाते... ज्याचा पक्षाला फटका बसतो. त्यामुळे मतदानाच्या आधीच मतदारांमधून उमेदवार निवडीची रणनीती आखलीय. मात्र हा फॉर्म्युला इच्छुकांच्या किती पचनी पडणार आणि त्याला मतदारांमध्ये किती यश मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT